चोऱ्यामाऱ्या, दरोडे घालूनही आमदार राहुल कुल साजूक असल्यासारखे वागतात 

जिथे जिथे खायला मिळतं ना, तिथं तिथं खाल्याशिवाय सोडायचचं नाही, अशी आमदार राहुल कुल यांची वृत्ती आहे.
MLA Rahul Kul should speak responsibly : Ramesh Thorat
MLA Rahul Kul should speak responsibly : Ramesh Thorat
Published on: 
Updated on: 

दौंड (जि. पुणे) : ‘‘ज्यांच्या ताब्यात वीस वर्ष भीमा पाटस साखर कारखाना आहे, त्या कारखान्याला या पाच वर्षांतच गळती का लागली?, याची चौकशी झाली पाहिजे. जिथे जिथे खायला मिळतं ना, तिथं तिथं खाल्याशिवाय सोडायचचं नाही, अशी आमदार राहुल कुल यांची वृत्ती आहे, चोऱ्यामाऱ्या करायला ते कोणाला ऐकणार नाहीत. एवढे दरोडे घालूनही ते साजूक असल्यासारखे वागतात, याचे वाईट वाटते. त्यांच्या खाबूगिरीमुळे भीमा पाटस कारखाना बंद पडला आहे,’’ असा हल्लाबोल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर केला. (MLA Rahul Kul should speak responsibly : Ramesh Thorat)

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने १५० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी भीमा पाटस सहकारी साखर कारखाच्या तारण मालमत्तेच्या जप्तीची कारवाई केली आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी माजी रमेश थोरात यांनी दौंड शहरात पत्रकार परिषद घेतली. त्यात थोरात यांनी आमदार राहुल कुल यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. या वेळी नोटरी अजित बलदोटा उपस्थित होते. 

दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपचे आमदार राहुल कुल यांनी सत्तेचा गैरवापर केला आहे. पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेच्या दीडशे कोटी रूपयांच्या थकबाकीसह एकूण साडेपाचशे कोटी रूपयांची देणी असताना कारखाना सुरू करण्याच्या वल्गना करून सभासदांचा विश्वासघात करणे योग्य नाही. कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार म्हणून जबाबदारीने बोलले आणि वागले पाहिजे, असे आवाहनही थोरात यांनी या वेळी केले.  
       
रमेश थोरात म्हणाले, ‘‘भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा बॅंकेने १५० कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी जप्तीची कारवाई केली आहे. पुरेशी संधी देऊन २११ एकर जागेसह तारण मालमत्ता जप्तीची ही कारवाई आहे. जप्तीनंतर परतफेडीसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव आला तरी आता बॅंकेला मुदत द्यायचा अधिकार नाही. ’’

भीमा पाटस कारखान्याच्या गोदामातील बॅंकेकडे तारण असलेल्या साखरेच्या पोत्यांना जानेवारी २०२० मध्ये लागलेल्या संशयास्पद आगीत साखर जळाली नाही, तर जाळली गेली आहे. आगीत ७०० पोतीसुध्दा जळाली नाहीत. पण, आगीच्या नावाखाली पोती विकण्यात आली, असा आरोपही रमेश थोरात यांनी या वेळी केला. 

कारखाना सुरु करण्यासाठी अजित पवारांनी बैठक घेतली होती
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या कर्जवसुलीसाठी पुणे येथील सर्किट हाउसमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक अजित पवार, बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात व कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांची आठ महिन्यांपूर्वी बैठक झाली होती. राजकारण न करता संस्थेच्या हितासाठी न्यायालयीन प्रक्रिया व लिलाव करण्यापेक्षा मध्यम वर्गाने वसुली कशी करता येईल, याकरिता ही बैठक होती. राहुल कुल यांनी दोन महिन्यांत सर्व करतो असे सांगितले होतो; परंतु प्रत्यक्षात थकबाकी दिली नाही, अशी माहिती रमेश थोरात यांनी या वेळी बोलताना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com