संजय जगतापांना शिवतारेंचा धक्का : युवक कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश 

पक्षातील वाढत्या नाराजीमुळे सागर मोकाशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले जाते.
Pune District Youth Congress Vice President Sagar Mokashi joins Shiv Sena
Pune District Youth Congress Vice President Sagar Mokashi joins Shiv Sena

गराडे (जि. पुणे) : शिवसेना नेते तथा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी कॉंग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांना धक्का दिला आहे. शिवतारे यांनी जगताप यांचे खंदे समर्थक सागर मोकाशी यांना फोडून आपल्या गोटात ओढले आहे. काही दिवसांपूर्वी युवक कॉंग्रेसचे तरुण कार्यकर्ते सूरज जगताप यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे पुरंदर तालुक्यात कॉंग्रेस पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला हा धोक्याचा इशारा मानला जात आहे. (Pune District Youth Congress Vice President Sagar Mokashi joins Shiv Sena)

पुरंदर तालुका युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष तथा पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सागर मोकाशी यांनी कॉंग्रेसला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट येथील शिवसेनेच्या कार्यालयात माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून मोकाशी यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. 

या वेळी हवेली तालुका शिवसेनेचे नेते शंकर हरपळे, तालुकाप्रमुख संदीप मोडक, पुरंदर तालुका युवा सेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, हवेली पंचायत समितीचे सदस्य राजीव भाडळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव सायकर, महिला आघाडीच्या संघटक सविता ढवळे, सुरज जगताप, राजाभाऊ होले, महेश हरपळे, सोमनाथ कऱ्हे आदी या वेळी उपस्थित होते. 

पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सागर मोकाशी हे आमदार संजय जगताप यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने आमदार जगताप यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. पुरंदर तालुक्यात युवक कॉंग्रेसच्या उभारणीत सागर मोकाशी यांचे योगदान मोठे मानले जाते. पक्षातील वाढत्या नाराजीमुळे सागर मोकाशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले जाते. यापूर्वी युवक कॉंग्रेसचे तरुण तडफदार कार्यकर्ते सूरज जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com