आळंदीचे माउली मंदिर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर 

वारकऱ्यांनी आळंदी (ता. खेड) येथे येण्याचा प्रयत्न करू नये. पंढरपूरप्रमाणेच आळंदीतही धर्मशाळा, मठ आणि लॉजमध्ये बाहेरच्या व्यक्तीस राहण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसा प्रयत्न केल्यास संबंधितांवर साथरोख प्रतिबंध अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल.
 Mauli temple in Alandi declared a restricted area
Mauli temple in Alandi declared a restricted area
Published on
Updated on

आळंदी : वारकऱ्यांनी आळंदी (ता. खेड) येथे येण्याचा प्रयत्न करू नये. पंढरपूरप्रमाणेच आळंदीतही धर्मशाळा, मठ आणि लॉजमध्ये बाहेरच्या व्यक्तीस राहण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसा प्रयत्न केल्यास संबंधितांवर साथरोख प्रतिबंध अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. सोबत आळंदीत चौदा दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त स्मिता पाटील आणि प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली. 

माऊलींच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर ज्येष्ठ वद्य अष्टमीला (ता. 13 जून) आळंदीत मोजक्‍याच व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. मात्र, नुकतेच आळंदीत कोरोनाने एक महिला मृत झाली आहे. पालखी सोहळ्याच्या तोंडावरच कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली. माऊली मंदीर व लगतचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला.

एकमेकांचे आरोग्य जपण्यासाठी वारकऱ्यांनी आळंदीत येण्याची गरज नाही. आपापल्या घरीच संतांचे पूजन करून परंपरा पाळणे गरजेचे बनले आहे. समाज स्वास्थ्यासाठी वारकऱ्यांनीही पायी वारी रद्द करण्याच्या सरकारच्या भूमिकेस पाठिंबा दिला आहे. यामुळे यंदाच्या वर्षी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी माउली मंदिरात सरकारने ठरवलेले प्रतिनिधीच पादुका प्रस्थानास उपस्थीत राहतील. प्रस्थान झाल्यानंतर पादुका मंदिरातील मागील बाजूच्या दर्शनमंडपात 30 जूनपर्यंत राहतील. या काळात देऊळवाडा सर्वसामान्यांसाठी पूर्णतः बंद राहील. कोरोनाच्या पर्श्वभूमीवर प्रशासनास प्रतिसाद द्यावा आणि कोरोनामुक्त शहर ठेवण्यास मदत करावी. भाविकांनी प्रस्थान काळातील आपली सेवा घरातूनच थेट प्रक्षेपण करून करावे, असे आवाहन श्रीमती पाटील आणि तेली यांनी केले. 

आळंदी पोलिस ठाण्याचे रवींद्र चौधर यांनी सांगितले की, प्रस्थान सोहळ्यासाठी शंभर पोलिसांची मागणी केली आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांना बॅरिकेडिंग केले जाईल. तर मरकळ चाकण औद्योगिक भागात जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत कोणताही बदल केला जाणार नाही. 
 

बारामतीत मास्कविना फिरु नका: अन्यथा.... 

बारामती : बारामतीत कोरोनाचे रुग्ण नसले तरी त्याचा धोका कायमच आहे. त्यासाठी पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकीय व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. वाहन चालविण्याचा परवाना तपासण्यापेक्षाही विनामास्क फिरणा-यांवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे बनत चालले आहे. शहरात सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत व्यवहारास परवानगी दिलेली आहे. त्यानंतरही लोक शहरात बिनधास्त फिरत असतात, अनेकांच्या तोंडाला मास्क किंवा रुमाल असतो पण अनेक जण विनामास्क व विनारुमाल बिनदिक्कतपणे फिरतात. 

लॉकडाउननंतरचे निर्बंध शिथील केल्यानंतर बारामतीचे चक्र पुन्हा सुरु झाले आहे. मात्र, मास्कबाबत अजूनही अनेक जण बेफिकीर असल्याने चिंतेचे वातावरण आहे. अनेक जण मास्कचा वापरच करीत नाहीत, ज्यांच्या तोंडावर मास्क आहे ते मास्क खाली करुन मोबाईलवर बोलण्यासह समोरच्या व्यक्तीशी संभाषण करतात. अनेक विक्रेते बिनधास्त मास्कविना विक्री करतात तर काही कर्मचारी मास्कशिवाय वावरतात, असे चित्र आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com