
पुणे : दूध दराच्या प्रश्नावरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात अपेक्षेप्रमाणे राजकीय जुगलबंदी रंगली आहे. दुधाचे दर घटल्याने सरकारने पाच रुपये अनुदान देण्याची मागणी शेट्टी यांनी केली होती. त्यावर पाटील यांनी ट्विट करून शेट्टी यांना टार्गेट करत ‘शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार, म्हणून शांत बसले आहेत,’ अशा शब्दांत हल्लबोल केला होता.
आमदार पाटील यांच्या या टीकेला राजू शेट्टी यांनीही जोरदार प्रतित्त्युर दिले आहे. ट्विटमध्ये शेट्टी यांनी म्हटले आहे की, चंद्रकांत दादा तुमच्या डोक्यात नेहमी राजकारण असतं. मी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करतो आहे. तुम्हाला खरोखरच शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर या आंदोलनात सामील व्हावा, असे खुले आव्हान दिले आहे.
पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, राज्यात दुधाला सध्या प्रतिलिटर २२ रुपये दर मिळत आहे. लॉकडाउन होण्याआधी ३२ रुपये भाव मिळत होता. त्याचा विचार करता दूध दरात सुमारे १० रुपयांची घसरण झाली आहे. तरीही आता राज्यात कुठेही निषेधाचा सूर निघत नाही. दूध दरासाठी आंदोलन करणारे माजी खासदार शेट्टीही आता शांत बसले आहेत. दूध उत्पादकांसाठी कायदा हातात घेण्याचे तुम्ही एकदा म्हटले होते. आता मात्र तुमच्याकडून दूध दराबाबत कोणतेही वक्तव्य होत नसल्याचे दिसत आहे. राजू शेट्टी कधी आंदोलन करणार आहेत, ते आम्हाला पहायचे आहे, असे त्यांनी म्हटले होते.
पाटील यांनी म्हटले होते की, राजू शेट्टी यांना आणखी एक सांगायचे आहे, ते म्हणजे राज्यात शेतकऱ्यांना युरिया कुठेच मिळत नाही. बांधावर जाऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आता घरात बसून फेसबुक लाइव्ह करत आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी शेट्टी यांच्या फेसबुक लाइव्हची खिल्ली उडविली होती. तसेच, ‘शेट्टी तुम्हाला आमदारकी मिळणार असल्याचे कळले. आमदार झाल्यानंतरच तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घ्याल. तोपर्यंत तुम्ही अगदी गप्प राहाल, असं वाटतं ,’ अशा टीका पाटील यांनी शेट्टी यांच्यावर केली होती.
आमदार पाटील यांच्या या टीकेला शेट्टी यांनीही ट्विटद्वारे उत्तर दिले आहे. त्यात शेट्टी म्हणतात की, चंद्रकांत दादा तुमच्या डोक्यात नेहमी राजकारण असतं. राजकीय हेतूनचे कधी काळी तुम्ही मला विष्णूचा अवतर म्हटलं होतं. माझ्या डोक्यात मात्र शेतकरी आणि शेतकरीच असतो. म्हणूनच केंद्र सरकारने जेव्हा दहा हजार टन दुध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला. त्याचक्षणी मी १० जुलै रोजी ट्विट करून पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिलं होतं.
येत्या २१ जुलै रोजी मी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करतो आहे. तुम्हाला खरोखरच शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर या आंदोलनात सामील व्हावा, असे आव्हान शेट्टी यांनी चंद्रकांतदादा यांना दिले आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.