
पुणे : "महाराष्ट्रातील चार हजार गलाई बांधव अजून पश्चिम बंगालमध्ये आहेत. परवाना पास काढण्यासाठी दिलेली लिंक ओपन होत नाही. या टेक्निकल अडचणीमुळे आम्ही अडकून पडलो आहोत," अशी माहिती पश्चिम बंगाल गलाई असोसिएशनचे अध्यक्ष अजितराव शिंदे बेणापूरकर यांनी दिली.
लॉक डॉऊनच्या काळात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील हजारो गलाई कामगार परराज्यात अडकून पडले होते. त्यांना महाराष्ट्रात आणावे म्हणून ते सतत प्रयत्न करत होते. खानापूरचे आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना त्यांच्या भागातील लोक फोन करून आपल्या व्यथा सांगत होते. या नेत्यांनी सातत्याने शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची कल्पना दिली होती. या नेत्यांनी जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री शरद पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. माजी मंत्री महादेव जानकर यांनीही राज्य सरकारला पत्र लिहून या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते.
गलाई बांधव वैतागले
केंद्र सरकारने वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या आणि स्वतःच्या राज्यात जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मजुरांना जाण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने गलाई कामगारांना महाराष्ट्रात येण्याचा मार्ग मोकळा झाला. सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करत गलाई बांधवांनी अर्ज केले, काहींना परवाने मिळाले मात्र आता पुन्हा परवाना देण्याची लिंक ओपन होत नाही. त्यामुळे गलाई बांधव वैतागले आहेत.
फॉर्म रिजेक्ट होत आहेत
'गलाई बांधवाना आता महाराष्ट्रात यायला काहीही अडचण नाही' असेच वातावरण निर्माण झाले आहे मात्र वास्तव वेगळे आहे. ऑनलाइन परवाना मिळवण्याची जी लिंक आहे ती ओपन होत नाही. अनेकदा फॉर्म रिजेक्ट होत आहेत. आता ही तांत्रिक बाब आहे. त्यामुळे आता कोणाला फोन करून ही बाब दुरुस्त होणार
नाही. केंद्र सरकारने आपआपल्या गावी जाण्याचा निर्णय दिला आहे मात्र परवाना काढतानाच जर अडचणी निर्माण होत असतील तर त्या त्या भागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
पश्चिम बंगाल गलाई असोसिएशनचे अध्यक्ष अजितराव शिंदे म्हणाले,"पश्चिम बंगालमधून दीड हजार गलाई बांधव आपआपल्या गावी गेले आहेत मात्र उर्वरित जे इथं राहिलेत त्यांना परवाना काढता येत नाही. लिंक ओपन होत नाही. तांत्रिक अडचण दूर झाली तर आम्हा सगळ्यांना परवाना मिळेल."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.