जावेद अख्तर यांना अटक करण्यापासून शिवसेनेला कोणी रोखलं ?

आम्ही त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण अद्याप कारवाई झालेली नाही
Sarkarnama (70).jpg
Sarkarnama (70).jpg
Published on: 
Updated on: 

मुंबई : ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर Javed Akhtar यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली आहे. यावरुन आता राजकारण पेटलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. तर भाजपचे आमदार राम कदम Ram Kadam यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. ''जावेद अख्तर यांना अटक करण्यापासून कोणी रोखलं आहे,'' असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

राम कदम यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना आणि जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे. राम कदम म्हणतात, ''संघाची तुलना तालिबान सोबत करणं चुकीचं असल्याचे शिवसेनेनं हे स्वीकारलं आहे. जावेद अख्तर यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीचे विधान चुकीचं आहे. आम्ही त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही,''

शिवसेनेच्या आमदारांनी पोलिसाच्या कानाखाली काढला 'आवाज'
''शिवसेना त्यांच्यावर कारवाई का करीत नाही. त्यांना अटक करण्यापासून शिवसेनेला कोणी रोखलं आहे. याचं उत्तर सत्तेत बसलेल्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला द्यावे लागेल. जावेद अख्तर यांना माफी मागावी लागेल. जावेद अख्तर यांनी भारतातील व्यवहार पाहिला आहे. त्यांनी तालिबान येथील व्यवहार पाहिलेला नाही.  एकदा त्यांनी तेथे जावं. तेथील तालिबानी व्यवहार पाहावा,  मग त्यांना आपोआप सद्बुध्दी सुचेल. त्यांनी हात जोडून माफी मागितली पाहिजे,'' अशी मागणी राम कदम यांनी केली.  


जावेद अख्तर याच्या विधानावरुन शिवसेना आक्रमक ; RSS ची तुलना तालिबानशी करणे अयोग्य
मुंबई : ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर Javed Akhtar यांना शिवसेनेनं खडे बोल सुनावले आहेत. ''लोकशाहीच्या बुरख्याआड काही लोक दडपशाही आणू पाहत असले तरी त्यांना मर्यादा आहेत. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे हे योग्य नाहीच, ते आम्हाला मान्यही नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने Shiv Sena 'सामना'च्या अग्रलेखातून घेतली आहे.
Edited by : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com