Pimpri Chinchwad Municipal Corporation
महाराष्ट्रातील नियोजनबद्ध वसवलेलं शहर म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेला ओळखले जाते. उद्योगनगरी अशीही या शहराची ओळख आहे. 2017 पर्यंत या महापालिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व होते. पण महेश लांडगे, लक्ष्मण जगताप अशा नेत्यांना आपल्याकडे घेऊन भाजपने 2017 च्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. 128 जागांपैकी 78 जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली होती. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सत्तेतील दोन प्रमुख पक्षांमध्ये लढत होणार आहे.