सध्या सोशल मिडीयावर गुंड निलेश घायवळचे दोन व्हिडिओ व्हायरल होतायेत. पहिला व्हिडिओ आहे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासोबतचा तर दुसरा व्हिडिओ आहे राम शिंदेंचे कट्टर विरोधक रोहित पवार यांच्या आईसोबतचा.
आज सकाळी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राम शिंदेंवर आरोप केले. निलेश घायवळ हा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या जवळचा आहे. राम शिंदे यांनी ओपन मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी निलेश घायवळचा उपयोग केल्याची चर्चा आहे. राम शिंदे यांनीच निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यासाठी मदत केली. शिंदेंनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना फोन करुन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली असावी. किवा गृहमंत्रालयातून त्यासाठी योगेश कदम यांच्यावर दबाव आला असावा, असा आरोप रोहित पवार यांनी केला. या आरोपांनंतर निलेश घायवळचा सभापती राम शिंदे यांच्या बरोबरचा व्हिडिओ ही व्हायरल झाला. सध्या सोशल मीडियावर आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांकडून गुंड निलेश घायवळ यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत अशी चर्चा होती मात्र थोड्याच वेळात गुंड निलेश घायवळ सोबत रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला.
कोविड काळात निलेश घायवळणी शाळेला केलेल्या मदतीचा सुनंदा पवार यांच्याकडून कौतुक करण्यात आलं. कोविड काळातला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आता निलेश घायवळचे अजून व्हिडिओज समोर येतात का? घायवळचे कोणत्या राजकीय नेत्यांशी संबध आहेत का? आणि घायवळ प्रकरणात आता काय माहिती पुढे येते सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहु त्यासाठी सरकारनामाला सबस्क्रआईब करायला विसरु नका.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.