प्रचारादरम्यान युवकांचा रोष; महापौरांच्या पतीने घेतला काढता पाय।Sanjay Kanchalvar। Chandrapur News।

प्रचारादरम्यान युवकांचा रोष; "निवडून गेल्यावर गायब होता" असा जाब, Video Viral

चंद्रपूरच्या निवर्तमान महापौरांचे पती आणि भाजप उमेदवार संजय कंचर्लावार यांना प्रचारादरम्यान मतदारांनी घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. यामुळे उमेदवारांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे. भानापेठ प्रभागातून संजय कंचर्लावार भाजप उमेदवार आहेत. बगड खिडकी परिसरात ते पोचताच स्थानिक युवकांनी त्यांना घेराव घातला. 2017 पासून 2022 पर्यंत ते इथे नगरसेवक राहिले. मात्र तरीही या भागातील समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे ते प्रचारासाठी इथे येताच स्थानिक युवकांनी त्यांना अडवले आणि जाब विचारला. युवकांचे हे उग्र रूप बघून संजय कंचर्लावार स्तब्ध राहिले. प्रचार करायला येता आणि निवडून गेल्यावर गायब होता, असे स्थानिकांचे म्हणणे होते. स्थानिकांचा हा रोष बघून शेवटी संजय कंचर्लावार आणि इतर उमेदवारांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. यापूर्वी भाजपच्या एका महिला उमेदवाराला असेच परतवून लावण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com