Shrirampur Water Crisis: श्रीरामपूर शहरात पाण्यासाठी उपोषण, आंदोलने आणि होमहवन सुरू असताना भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उपरोधिक भाष्य केले. ‘तुमच्या उपोषणाने पाऊस पडत असेल तर बसा, भाषणाने पाऊस पडत असेल तर भाषणे करा आणि तुमच्या होमहवनाने धरणाचे दरवाजे उघडून पाणी मिळत असेल तर हवन करा,’ असा टोला त्यांनी लगावला. मात्र, पाणीवाटपाचा निर्णय घेताना एक चूक संपूर्ण तालुक्याला पुढील बारा महिने पाण्यापासून वंचित ठेवू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.