मनपा मुख्यालयात शासकीय चालकाचा मद्यपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल, महापौरांची भूमिका काय?।Thane News

आयुक्त व महापौरांच्या वाहनांच्या पार्किंगमध्ये दुपारी घडला प्रकार; प्रशासनात खळबळ, महापौरांनी आयुक्तांकडून माहिती घेऊन कारवाईचे आदेश

ठाणे महापालिकेच्या मुख्यालय परिसरात दुपारी घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. शासकीय वाहनामध्ये अक्षरशः वाहन चालक मद्यप्राशन करतानाचा व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे... मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार आयुक्त व महापौर यांच्या अधिकृत वाहनांच्या पार्किंग परिसरात घडला आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महापालिकेच्या मुख्यालयासारख्या संवेदनशील आणि उच्च सुरक्षा असलेल्या ठिकाणी घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून या बाबत नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पालिका आयुक्त यांच्या कडून माहिती घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com