Bhole Baba : पांढरा सूट अन् स्वत:ची आर्मी; कोण आहे हा भोले बाबा ?

Uttar Pradesh Hathras Bhole Baba : उत्तरप्रदेश येथे सत्संगात चेंगराचेंगरी; शेकडोंचा मृत्यू
Bhole Baba
Bhole Baba Sarkarnama

उत्तरप्रदेशातील हाथरस येथे एक धक्कादायक घटना घडली. भोले बाबा यांच्या सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलं, महिला आणि वृध्द व्यक्तींचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेनंतर सर्वांत मोठा प्रश्न उपस्थित होतोय की कोण आहे हा भोले बाबा? पांढरा सूट, स्वत:ची आर्मी कोण आहे हा भोले बाबा?

या भोले बाबाचं खरं नाव आहे नारायण हरी. तो एटा जिल्ह्यातील बहादुरनगरी येथील रहिवासी आहे. त्याचं राजकीय कनेक्शनसुद्धा आहे, असं सांगितलं जातंय. काही मोठ्या कार्यक्रमांत त्याच्या व्यासपीठावर उत्तरप्रदेशातील बड्या राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली आहे. या यादीत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याही नावाचा समावेश आहे.

पोलिसाची नोकरी सोडून बनला भोले बाबा

भोले बाबा त्याच्या प्रत्येक सत्संगात पत्नीसोबत हजेरी लावतो. हा बाबा म्हणे दान-दक्षिणा घेत नाही! त्याचं प्राथमिक शिक्षण एटा जिल्ह्यात झालं. बालपणी वडलांसोबत शेतात काम केलं. नंतर पोलिसात भरती झाले. यूपीमधील 12 पोलिस ठाण्यांमध्ये त्याची पोस्टिंग तर झालीच शिवाय इंटेलिजंस यूनिटसोबतही त्यानं काम केलं. 18 वर्षे नोकरी केल्यानंतर त्यानं 90 च्या दशकात VRS घेतली आणि आपल्या गावी झोपडी बांधून राहू लागला.

'नारायण हरी'चा बनला 'साकार विश्वहरी!'

अध्यात्माकडं वळल्यानंतर त्यानं आपलं नाव बदलून 'अपना साकार विश्वहरी' असं ठेवलं. त्याची पत्नी देखील त्याच्या सत्संगात सहभाग घेत असते. इतर बाबा-बुवांप्रमाणं तो भगवा पोशाख परिधान करत नाही. तो त्याच्या सत्संगात पांढरा सूट, टाय आणि बूट घालतो. कित्येकदा तर तो कुर्ता-पायजमा आणि डोक्यात पांढरी टोपी घालून सत्संग करताना दिसतो.

दैवी साक्षात्कार झाल्याचा दावा

भोले बाबा यूपी शिवाय आसपासच्या राज्यांतील लोकांनाही देवाच्या भक्तीची शिकवण देत असतो. मला ठाऊक नाही की सरकारी नोकरीतून मला अध्यात्म मार्गाकडं कुणी ओढलं? नोकरीतून VRS घेतल्यावर मला दैवी साक्षात्कार झाला. माझा देह त्या परमात्म्याचा अंश असल्याची प्रेरणा मला त्या देवाकडूनच मिळाली. मी स्वत: कुठंच जात नाही उलट माझे भक्तच मला बोलावतात. भक्तांच्या विनंतीवरून मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सत्संग करत असतो, असं हा भोले बाबा आपल्या सत्संगात सांगत असतो.

IAS-IPS अधिकारी, राजकीय नेतेमंडळी चेले!

IAS-IPS अधिकारी देखील त्याचे चेले आहेत. त्याच्या सत्संगात राजकीय नेतेमंडळी, बडे अधिकारी हजेरी लावत असतात. तो लग्न देखील लावून देतो म्हणे! यूपी, राजस्थान आणि मध्य प्रदेशात या भोले बाबाचा भक्तगण पसरला आहे. त्याचं यूट्यूब चैनल आणि फेसबुक पेज देखील आहे. यूट्यूबवर त्याचे 31 हजार सब्सक्रायबर्स आहेत. फेसबुक पेजवर त्याचे जास्त फॉलोअर्स नसले प्रत्यक्षात तरी त्याचे लाखो अनुयायी आहेत. त्याच्या प्रत्येक सत्संगाला लाखोंच्या गर्दीनं भक्त जमतात.

कोरोनातही भोले बाबा वादात !

देशात सर्वत्र कोरोनाचं थैमान सुरू असताना मे 2022 फर्रुखाबाद येथे या भोले बाबानं सत्संग भरवला होता. केवळ 50 जणांना सत्संगात सामील होण्याची परवानगी देण्यात आली असताना या सत्संगात 50 हजारांहून जास्त लोक सहभागी झाले होते. त्यावेळी जिल्हा प्रशासनाकडून आयोजकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. यावेळी देखील प्रशासनाला कळवण्यात आलेल्या संख्येपेक्षा कितीतरी जास्त लोक सत्संगात सामील झाले होते, असं सांगण्यात येतंय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com