Sakal-Saam Mahasurvekshan : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारबद्दल लोकांना काय वाटते, या संदर्भात 'सकाळ' माध्यम समूहाने एक महासर्वेक्षण केले आहे.
'सकाळ व साम महासर्वेक्षण 2023' मध्ये राज्यातील नागरिकांची मते जाणून घेतली आहे. सकाळच्या राज्यभरातील दोन हजार बातमीदारांनी या महासर्वेक्षणासाठी काम केले आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघ, 48 लोकसभा मतदारसंघातून समाजाच्या सर्व स्तरातून 49 हजार 231 नागरिकांचे मत विचारात घेण्यात आले आहे.
महासर्वेक्षणामध्ये 2024 ला कोणता पक्ष निवडून यावा असे वाटते? असा प्रश्न विचारला होता. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) निवडून यावा, असे 33.8 टक्के लोकांना वाटते. तर काँग्रेसलाही लोकांनी मोठी पसंती दर्शवली आहे. काँग्रेस (Congress) निवडून यावी असे 19.9 टक्के लोकांना वाटते. तर राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) 15.3 टक्के लोकांनी पसंती दर्शवली. तसेच शिवसेना (शिंदे गट ) 5. 5 टक्के लोकांनी पुन्हा निवडून यावे, असे म्हटले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला 12. 5 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
दरम्यान, मोदी सरकारचे 9 वर्षातील सर्वात मोठे अपयश कोणते, असे आपल्याला वाटते? असा प्रश्न या महासर्वेक्षणामध्ये विचारण्यात आला होता. यामध्ये 39.3 टक्के नागरिकांनी महागाई, असे म्हटले आहे. तर त्यानंतर सर्वांत जास्त लोकांना बेरोजगारी वाटते. बेरोजगारी 18.6 टक्के नागरिकांनी म्हटले आहे.
त्यानंतर इंधन दरवाढ हे मोठे अपयश असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. 12 टक्के नागरिकांनी हे अपयश असल्याचे म्हटले आहे. तर 11.5 टक्के लोकांनी म्हटले आहे की मोदी सरकारला कोणतेही अपयश आलेले नाही. नागरिकांनी नोटबंदी हेही अपयश असल्याचे म्हटले आहे. सीमा सुरक्षेमध्ये अपयश आल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे. सांगता येत नाही, असे सात टक्के नागरिकांनी म्हटले आहे. नऊ वर्षामध्ये मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश म्हणजे महागाई असे नागरिकांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.