6th October in History - कर्नाटकातला सत्तेचा 'रोलर कोस्टर'

Dinvishesh : 6 ऑक्टोबर 2010 रोजी 21 आमदारांनी येडियुरप्पा सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे त्यांचे सरकार अल्पमतात आले होते. पण 13 ऑक्टोबरला येडियुरप्पांनी १०६ आमदारांच्या पाठिंब्यावर बहुमत सिद्ध केले होते.
Dinvishesh 6th October 2024
Dinvishesh 6th October 2024 Sarkarnama
Published on
Updated on

सत्ता म्हटली की चढ-उतार हे आलेच. कर्नाटक राज्याने हे खूपचा अनुभवले आहे. विशेषतः बी. एस. येडियुरप्पा यांनी ही 'रोलर कोस्टर' राईड अनेकदा अनुभवली आहे.

2007

येडियुरप्पा हे 2007 साली पहिल्यांदा सत्तेत आले. अवघ्या सात दिवसात म्हणजेच 19 नोव्हेंबर 2007 रोजी सरकार ढासळलं आणि येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं.

2008

2008 च्या विधानसभा निवडणुकीत बी एस येडियुरप्पा यांनी शिकारीपुरा मतदारसंघातून विजयी झाले त्यांच्या नेतृत्त्वात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि सत्तेत आला. त्यावेळी कर्नाटकात भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केलं आणि 30 मे 2008 रोजी येडियुरप्पा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले मात्र तीन वर्षांनी खाण आणि जमीन गैरव्यवहाराच्या आरोपावरुन 2011 मध्ये येडियुरप्पांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं.

2018

2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 222 पैकी 104 जागा जिंकल्या. बहुमतासाठी 8 जागा कमी होत्या. पण तरीही सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं. काँग्रेस-जेडीएसने आक्षेप घेतल्याने हे सर्व प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. तिथे येडियुरप्पांना दिलासा मिळाला. 17 मे 2018 रोजी येडियुरप्पांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, तेव्हा ते बहुमत सिद्ध करु शकले नाहीत. त्यामुळे त्यांना केवळ अडीच दिवसात राजीनामा द्यावा लागला होता.

अशीच वेळ येडियुरप्पांवर 2010 मध्येही आली होती. त्यावेळी सरकारमधील मतभेदांमुळे आजच्या दिवशी म्हणजे 6 ऑक्टोबर 2010 रोजी 21 आमदारांनी येडियुरप्पा सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे त्यांचे सरकार अल्पमतात आले होते. पण 13 ऑक्टोबरला येडियुरप्पांनी १०६ आमदारांच्या पाठिंब्यावर बहुमत सिद्ध केले होते.

Dinvishesh 6 October 2024
Dinvishesh 6 October 2024Sarkarnama
Dinvishesh 6th October 2024
5th October in History- प्रतिबंधात्मक वटहुकूम, एचएमटीचे उद्घाटन

दिनविशेष - 6 ऑक्‍टोबर

1732 ः पहिले नाविक पंचांग करणारे व सागरातील स्थानाचे रेखांश निश्‍चित करण्याची पद्धत शोधून काढणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ नेव्हिल मॅस्केलिन यांचा जन्म.

1779 ः ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचे गव्हर्नर, प्रशासक व इतिहासकार माउंट स्ट्युअर्ट एल्फिन्स्टन यांचा जन्म. मुंबई प्रांताचे गव्हर्नर असताना त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांनी "हिस्टरी ऑफ इंडिया' या दोन खंडांत भारताचा इतिहास लिहिला.

1893 ः आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर भारतीय पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ मेघनाद साहा यांचा जन्म. खगोलभौतिकी या विषयात आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होत.

1949 ः पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.

1979 ः नामवंत इतिहास संशोधक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू महामहोपाध्याय डॉ. दत्तो वामन पोतदार यांचे निधन. मराठी शुद्धलेखन महामंडळाचे ते अध्यक्ष होते. प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास या विषयांचा त्यांचा विशेष व्यासंग होता. मराठीप्रमाणेच इंग्रजी, हिंदी व संस्कृत या भाषांतही ते प्रभावीपणे भाषणे करीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com