7th October in History - अमेरिकेचा लादेनला तडाखा

7th October Dinvishesh : ७ ऑक्टोबरच्या त्या रात्री अमेरिकन संरक्षण दलांनी काबूल, जलालाबाद, कंदाहार तसेच मझार-ए- शपीफ या शहरांवरचे हल्ले एकाच वेळी सुरु केले.
Dinvishesh 7 October
Dinvishesh 7 OctoberSarkarnama
Published on
Updated on

२००१ साली आजच्या दिवशी म्हणजे ७ ऑक्टोबर रोजी रात्री अमेरिकेने अचानक अफगाणीस्तानवर हल्ले सुरु केले. ९/११ च्या हल्ल्यानंतर अवघ्या सव्वीस दिवसांत अमेरिकेने ओसामाला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.

७ ऑक्टोबरच्या त्या रात्री अमेरिकन संरक्षण दलांनी काबूल, जलालाबाद, कंदाहार तसेच मझार-ए- शपीफ या शहरांवरचे हल्ले एकाच वेळी सुरु केले. या हल्ल्यात ब्रिटनचाही सहभाग होता. या शहरांवर अमेरिकेच्या २५ लढाऊ विमानांनी टाॅमहाॅक क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा केला.

दुसऱ्या बाजूने अमेरिका आणि ब्रिटनच्या युद्धनौकांनी आणि पाणबुड्यांनीही अफगाणीस्तानच्या दिशेने क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. अल् कायदाची प्रशिक्षण केंद्र उध्वस्त करणे हा या हल्ल्यांमागचा प्रमुख हेतू होता. पुढचे काही दिवस हे हल्ले सुरुच होते. त्यामुळे ओसामा बिन लादेनचे कंबरडे मोडले खरे.

पुढची काही वर्षे त्याला एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर आश्रय घ्यायला लागला. मात्र, स्वतः लादेनला अमेरिका धक्का लावू शकली नव्हती. तो दिवस यायला २ मे २०११ या दिवसाची वाट पहावी लागली. त्या दिवशी अमेरिकेच्या सील्सने पाकिस्तानातल्या अबोटबादमध्ये ओसामा बिन लादेनचा खातमा केला.

दिनविशेष - 7 ऑक्‍टोबर

1905 - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी पुण्यात विलायती कपड्यांची जाहीर होळी करुन क्रांतिकार्याची सुरवात केली.

1994 - राष्ट्रीय एकात्मतेसाठी उल्लेखनीय कामगिरी बजाविल्याबद्दल स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ गांधीवादी विश्‍वंभरनाथ पांडे यांची इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कारासाठी निवड.

1998 - माजी महसूलमंत्री आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते भाऊसाहेब वर्तक यांचे निधन.

Dinvishesh 7 October
NCP Ajit Pawar : पुरोगामित्व जपण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक!

2003 - अलेक्‍सी ऍब्रिकोसोव, अँथनी लेगेट आणि विताली गिंझबर्ग यांना पदार्थविज्ञान शास्त्रातील अतुलनीय कार्याबद्दलचे नोबेल पारितोषक जाहीर. अत्यंत कमी तापमानाला पदार्थांच्या अवस्थेबद्दल केलेल्या संशोधनाबद्दल या तिघांना हे पारितोषिक देण्यात आले आहे. या तिन्ही शास्त्रज्ञांनी पुंज पदार्थविज्ञानातील "सुपर कंडक्‍टिव्हिटी' आण "सुपरफ्लुईडिटी' या दोन संकल्पनांवर आधारित सिद्धांतांवर केलेल्या कामाबद्दल त्यांना नोबेल पारितोषक देण्यात येत असल्याचे "द रॉयल स्वीडश ऍकॅडमी ऑफ सायन्सेस'च्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Dinvishesh 7 October
Radhakrishna Vikhe Vs Sharad Pawar : '..आणि आपण त्यांचे फोटो लावत बसायचे का?' ; मंत्री विखेंची शरद पवारांच्या राजकारणावर टीका!

2004 - वर्धा येथील गीताई मंदिराचा अमृतमहोत्सवी स्थापना दिवस साजरा. विनोबा भावे यांनी 7 ऑक्‍टोबर 1930 या दिवशी "ऐहिक सुखात निजल्या बाळाला जागे करण्यासाठी' "गीता-आई'चे लिखाण सुरू केले होते. आईच्या मागणीनुसार विनोबांनी गीतेचे मराठीत रूपांतर केले. परंतु आईचे निधन झाले म्हणून विनोबांनी गीतेला "गीता-आई' म्हटले. या "गीताई'तील श्‍लोक गीताई मंदिरातील दगडांवर कोरले आहेत. आजवर "गीताई'च्या 237 आवृत्त्या निघाल्या असून, सुमारे साडेछत्तीस लाख प्रती लोकांपर्यंत पोचल्या आहेत. फक्त मराठीच नाही; तर गुजराती, हिंदी, आसामीसारख्या अन्य भारतीय भाषांमध्येही "गीताई'चा पद्यानुवाद झालेला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com