काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीच्या मतदानाला दांडी मारणारे महाराष्ट्रातील ‘ते’ १९ जण कोण?

काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून ९६ टक्के मतदान झाले आहे.
Congress president  election
Congress president electionSarkarnama

मुंबई : काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या (president) निवडणुकीत (election) महाराष्ट्रात (Maharashtra) ९६ टक्के मतदान झाले. राज्यातील काँग्रेसच्या ५६१ प्रतिनिधींपैकी ५४२ मतदारांनी मतदान केले आहे. पोस्टल मतदानाचाही यामध्ये समावेश आहे. मतदान न करणारे १९ जण कोण, अशी चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (96 percent voter turnout in Maharashtra for Congress president election)

राहुल गांधी यांनी नकार दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी अनेक वर्षांनंतर निवडणूक हेात आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार शशि थरूर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दोघांनीही मोठ्या जोशात प्रत्येक राज्यात जाऊन प्रचार केला आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे काँग्रेसप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Congress president  election
...तर भाजपचा मोठा पराभव झाला असता : जयंत पाटील यांनी केला दावा

मुंबईत काँग्रेस पक्षाचे मुख्यालय असलेले टिळक भवन येथे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज मतदान झाले. टिळक भवनात मतदानासाठी तीन बूथची व्यवस्था करण्यात आली होती. ही मतदान प्रक्रिया सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत पार पडली. माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते. दिनेश कुमार, नरेंद्र रावत, आमदार कृष्णा पुनिया यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजू यांना साहाय्य केले.

Congress president  election
'ये बहुत गलत हुआ है' : भाजपच्या माघारीच्या निर्णयावर मुरजी पटेलांचे कार्यकर्ते संतप्त

काँग्रेस कमिटीने दिलेले बारकोड असलेले ओळखपत्र तसेच फोटो ओळखपत्राची तपासणी करूनच मतदारांना प्रवेश देण्यात आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधीमंडळातील पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

Congress president  election
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होणार? : दिल्लीहून आलेल्या नेत्याने घेतली फडणवीसांची भेट; भाजपच्या बैठकांना वेग

राहुल गांधी यांच्यासोबत काही प्रदेश प्रतिनिधी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यांनी भारत जोडो यात्रेच्या कॅम्प मतदान केंद्रावर मतदान केले. इतर राज्यांत काही प्रदेश प्रतिनिधी हे निवडणूक अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून गेले आहेत. त्यांनी त्या त्या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. नागपूर, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींची निवडणूक असल्याने तेथील प्रदेश प्रतिनिधींनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले आहे.

पोलिंग एजंट व प्रदेश निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत मतदानानंतर मतपेट्या सील करून दिल्लीला पठवण्यात आल्या आहेत. येत्या १९ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com