उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती तरी आदित्य हेच ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी सत्ताधाऱ्यांचे (Mahavikas Aghadi) चहापान
Aditya Thackeray

Aditya Thackeray

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : राज्य विधीमंडळाचे अधिवेशनाच्या (Assembly WInter Session) पूर्वसंध्येपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अजूनही ठणठणीत झाले नसल्याने ते आज पूर्वसंध्येच्या चहापानाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांची कसर या कार्यक्रमात युवासेनचे प्रमुख आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भरून काढली. त्यांच्याभोवतीच मंत्री, आमदारांचा गराडा राहिला.

चहा घेत, आदित्य प्रत्येकाशी बोलत, कामे ऐकून घेत होते. या गर्दीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई दिसत असले; तरी आदित्य यांच्याभोवतीच प्रामुख्याने सेना आमदारांचा गराडा नजरेस पडला.

Aditya Thackeray-Eknath Shinde

Aditya Thackeray-Eknath Shinde

Sarkarnama

राज्य विधीमंडळाचे अधिवेशन बुधवारपासून (ता.२२) सुरू होणार आहे. त्याआधी सह्याद्री अतिथिगृहातील चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्ष भाजपने बहिष्कार घातला. त्यानंतरही कार्यक्रम झाला. त्याला मुख्यमंत्री ठाकरे येणार असलयाची चर्चा होती. मात्र ५:३० वाजता आदित्य ठाकरे एकटेच आल्याने मुख्यमंत्री येणार नसल्याचे स्पष्ट झाले. तेव्हाच उपमुखयमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणासह सारे मंत्रीमंडळ सह्याद्रीत दाखल झाले होते.

Ajit Pawar-Aditya Thackeray

Ajit Pawar-Aditya Thackeray

Sarkarnama

या कार्यक्रमात मुख्यमंत्री नसल्याने सेनेच्या नेत्यासाठी आदित्य हेच आकर्षणाचे केंद्र राहिले. त्यांच्यासोबत मंत्री, आमदारांसोबत फोटोसेशनही केले. बहुतांश मंत्री या चहापानाला हजर राहिले. त्यातही अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि अशोक चव्हाण असे ज्येष्ठ मंत्री एकमेकांशी गप्पा मारत होते. आदित्य यांच्याभोवती शिवसेनेचे भगव्या रंगाची छटा असलेले झब्बे घातलेले आमदार जास्त संख्येने दिसत होते. या वेळी सर्व नेत्यांचे एकत्रित फोटोसेशन झाले. तेव्हाही कॅमेरामन यांचा आदित्य, तुम्ही फ्रेममध्ये या, असा आग्रह सुरू होता.

Aditya Thackeray and Ajit Pawar

Aditya Thackeray and Ajit Pawar

Sarkarnama

विधीमंडळाच्या दर अधिवेशनाच्या आधी हे चहापान होत असते. त्यावर विरोधक बहिष्कार टाकतात, ही परंपरा या वेळीही पाळली गेली. या चहापानाच्या आधी मंत्रीमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री या बैठकीला व्हिडीओ काॅलवर हजर होते. मुख्यमंत्र्यांच्या या अनुपस्थितीबद्दल भाजपने नाराजी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com