कटकारस्थान करून त्यावेळी मला मुख्यमंत्रिपदावरून काढलं अन्‌ राज्यपाल केलं : सुशीलकुमार शिंदेंचा स्वकीयांवर हल्ला

गुजराती समाजाला आरक्षण दिले, कारण माझा जावईच गुजराती असल्यामुळे मला ते त्यावेळी करावे लागले होते.
Sushil Kumar Shinde
Sushil Kumar ShindeSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : काँग्रेस (Congress) पक्षातील लोकांनी कट कारस्थान करून त्यावेळी मला मुख्यमंत्रीपदावरुन (Chief Minister) काढलं आणि राज्यपाल (Governor) म्हणून आंध्र प्रदेशला पाठविले. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांनी स्वपक्षीय नेत्यांवर नाव न घेता निशाणा साधला आहे. (After conspiracy, I was removed from the post of Chief Minister and made Governor : SushilKumar Shinde)

महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोलापुरात भारत गौरव पुरस्कार देऊ गौरविण्यात आले. त्या सत्काराला उत्तर देताना शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना झालेली निवडणूक आणि ती जिंकूनही पदावरून हटविल्याची खंत व्यक्त केली.

Sushil Kumar Shinde
योगेश कदमांनी बंड केले अन्‌ सूर्यकांत दळवींची राजकीय साडेसाती संपली!

शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री असताना मी गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले होते. तेवढे एक चांगले काम मी गुजराती समाजासाठी केले होते. लोक आता विसरून गेले की सुशीलकुमारांनी ते चांगले काम केले. एका गुजराती साधूंनी मला बोलावून घेऊन आशीर्वाद दिला होता. गुजराती समाजाला आरक्षण दिले, कारण माझा जावईच गुजराती असल्यामुळे मला ते त्यावेळी करावे लागले होते. जावयाला सांभाळायचं म्हणजे हे सर्व करावं लागतं (त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला). त्यावेळी तशी परिस्थितीच होती, ते मला करावं लागलं होतं.

Sushil Kumar Shinde
‘दामाजी’च्या निवडणुकीपासून दुरावलेले परिचारक-आवताडे समर्थक आले एकाच व्यासपीठावर!

मुख्यमंत्री असताना मी हे सगळं केल्यामुळेच मी महाराष्ट्रात परत निवडणुका जिंकून आलो होतो. त्यावेळी निवडणुका जिंकणं साधी गोष्ट नव्हती. मात्र, (व्यासपीठाकडे बोट दाखवत) यांना माहिती आहे, आतले कारस्थान. कसं मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढलं आणि राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशला पाठविलं. पण ठीक आहे. मी त्यानंतर दिल्लीच्या मंत्रीमंडळात गेलो. ज्या लोकांनी मला आंध्रला पाठवलं. ‘त्यांना’ जो पराभव पत्करावा लागला, तो अजूनपर्यंत आहे. असं होतं. पण आपण आपलं काम प्रामाणिकपणं करत राहिलं पाहिजे, या शब्दांत शिंदे यांनी काँग्रेसमधील नेत्यांवर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com