लेकीचा अन्‌ जावयाचा अजितदादांनी हट्ट पुरवताच चोपदाराच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू!

अजितदादांच्या या आपुलकीच्या चौकशीने चोपदार मोरे यांची लेक आणि जावई अक्षरश: भारावून गेले.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) हे आपल्या रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या करड्या शिस्ताचा अनेकांना प्रसाद मिळाला आहे. मात्र, कुटुंबवत्सल अजितदादा बुधवारी (ता. २ फेब्रुवारी) मंत्रालयात अनुभवायला मिळाले. आपल्याच कार्यालयातील चोपदाराची मुलगी आणि जावई यांना अजित पवारांना भेटायची इच्छा होती. मात्र, चोपदाराचे बोलायचे धाडस होत नव्हते; अखेर धाडस करून ते बोलले आणि अजितदादांनी त्यांची इच्छा बुधवारी पूर्ण केली. त्यांच्याशी संवाद साधत ख्यालीखुशालीही विचारली, तसेच मुलगी आणि जावयाच्या कर्तबगारीबद्दल चोपदाराचेही कौतुक केले. (Ajit Pawar fulfilled the wish of Chopdara's daughter and Javaya)

उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सध्या अर्थसंकल्प तयारीच्या बैठका सुरू आहेत. अजितदादा हे सकाळी आठलाच मंत्रालयात येतात. दिवसभर ते या बैठकांमध्ये व्यस्त असतात. पण, त्यातूनही वेळ काढत पवार यांनी आपल्या कार्यालयातील चोपदार विलास मोरे यांची मुलगी आणि जावयाची भेटण्याची इच्छा पूर्ण केली. नुसतेच ते भेटले नाही तर त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. या वेळी त्यांनी मुंबईत कुठे राहता. कुठल्या शाळेत शिकलात. अमेरिकेत कधी गेलात. अमेरिकेत कुठे राहत होता. तिथं कामाची वेळ, स्वरूप कसं असतं. तिथं छोट्या बाळाला कोण सांभाळतं, असे अनेक प्रश्न विचारले. लग्न कसं जमलं, लव्ह की अरेंज मॅरेज? हा प्रश्नही विचारत पवारांनी दोघांच्या घरच्यांचीही आपुलकीनं चौकशी केली. अजितदादांच्या या आपुलकीच्या चौकशीने चोपदार मोरे यांची लेक आणि जावई अक्षरश: भारावून गेले.

Ajit Pawar
गोव्याच्या रणसंग्रामात फडणवीसांच्या मदतीला मंगळवेढ्यातून रसद!

उपमुख्यमंत्री कार्यालयात विलास मोरे हे चोपदार म्हणून सचोटीने काम करत आहेत. ते येत्या काही दिवसांत निवृत्त होत आहेत. मोरे यांची मुलगी स्नेहा हिचे चार वर्षांपूर्वी गणेश साळुंखे यांच्याशी लग्न झाले आहे. त्यांचे जावई साळुंखे हे अमेरिकेत आयटी कंपनीत नोकरीला आहेत. अमेरिकेत ते स्थायिक होते. मात्र, ते कोरोना महामारीमुळे भारतात परत आले असून भारतातूनच काम करत आहेत. मोरे यांची मुलगी आणि जावई यांनी उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याची अनेक दिवसांपासून इच्छा व्यक्त करत होते. लेकीची आणि जावयाची इच्छा अजितदादांना सांगण्याची हिम्मत चोपदार विलास मोरे यांची होत नव्हती.

Ajit Pawar
जिल्हाधिकाऱ्यांनी झुगारला राष्ट्रवादीचा दबाव : सरपंचांसह ५ जणांवर अपात्रतेची कारवाई

मुलीला आणि जावयाला आपल्याला भेटायचे आहे, असे मोरे यांनी परवा हिंमत करुन अजित पवार यांना सांगितले. अजितदादांनी त्यास तत्काळ होकार दिला. अर्थसंकल्पामुळे व्यस्त वेळापत्रक असूनही दुसऱ्या दिवशीच त्यांना भेटायला बोलवलं. पवारांची परवानगी मिळताच चोपदार मोरे यांची कन्या स्नेहा आणि जावई गणेश यांनी अजित पवारांची बुधवारी भेट घेतली. उपमुख्यमंत्री पवार यांनीही आपुलकी, जिव्हाळ्यानं त्यांच्याशी संवाद साधला. वैयक्तिक, कौटुंबीक चौकशी केली. अजितदादांनी चोपदार मोरे यांचंही मुलगी आणि जावयाच्या कर्तबगारीबद्दल कौतुक केले. उपमुख्यमंत्र्यांकडून झालेले कौतुक तसंच लेकीचा, जावयाचा हट्ट अजितदादांनी पुरवल्यामुळं निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले चोपदार विलास मोरे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांची लेक आणि जावईही अजितदादांच्या अपुलकीमुळे अक्षरश: भारावून गेले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com