अजितदादांनी मागणी मान्य करताच फडणवीस ट्विट करत म्हणाले...

त्र्यंबकेश्वर, सासवड आणि मुक्ताईनगर येथील संतांच्या समाधिस्थळाचा विकासासाठी आवश्यक तो निधीही राज्य सरकार देईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.
Devendra Fadnavis-Ajit Pawar
Devendra Fadnavis-Ajit PawarSarkarnama

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षातून विस्तवही जात नाही, अशी परिस्थिती आहे. दोन्ही बाजूचे नेते दररोज एकमेकांवर अक्षरशः तुटून पडतात. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेली मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तत्काळ मंजूर केली. त्याबद्दल फडणवीस यांनी जाहीरपणे अजितदादांचे आभार मानले आहेत. (Ajit Pawar immediately accepted demand of Devendra Fadnavis)

अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी फडणवीस यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव महाराज, श्रीसंत मुक्ताबाई यांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी (७२५ व्या) समाधी वर्षानिमित्त निधी देण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांची मागणी मान्य करत असल्याचे जाहीर केले.

या वेळी बोलताना अर्थमंत्री पवार म्हणाले की, अर्थसंकल्प जाहीर करत असताना माझ्याकडून ही गोष्टी राहून गेली होती. मात्र, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राज्यातील संतपरंपरेवर सर्वांची नितांत श्रद्धा आहे. (स्व.) विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना पंढरपूर, देहू, आळंदी आणि भंडारा डोंगर येथे विकासकामे करण्यासाठी ४०० कोटींचा निधी दिला होता. त्यातून त्या ठिकाणी विकासकामे झाली. काही सुरू आहेत. पण, त्र्यंबकेश्वर, सासवड आणि मुक्ताईनगर येथील संतांच्या समाधिस्थळाचा विकासासाठी आवश्यक तो निधीही राज्य सरकार देईल, अशी घोषणा केली. मागणी मान्य केल्याबद्दल फडणवीस यांनी ट्विट करत अजित पवारांचे आभार मानले आहेत.

Devendra Fadnavis-Ajit Pawar
भाजपचं ठरलं : कोल्हापूर उत्तरमधून लढणार; फडणवीस दिल्लीतून उमेदवार जाहीर करणार

पहाटेच्या शपथविधीनंतर फडणवीस आणि पवार यांच्याकडे हालचालींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. ते दोघे एखाद्या कार्यक्रमाला एकत्र येणार म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळाच्या भूवया उंचावल्या जातात. त्यातच पोलिस दलातील बदल्यामधील गैरव्यवहाराबाबतची माहिती फोडल्याच्या प्रकरणावरून राज्य सरकारडून फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळी अजित पवार यांनी ‘महाराष्ट्राला नोटिशीची परंपरा नाही. दोन्ही बाजूने विचारपूर्वक वागण्याची गरज आहे,’ असे वक्तव्य केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com