दशरथदादा म्हणायचे ‘मी पुण्याचा कृषिमंत्री’, तर नाना देवकाते स्वतःला मुख्यमंत्री समजायचे!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितला दशरथ माने आणि विश्वास देवकाते यांचा जिल्हा परिषदेत पदाधिकारी असतानाचा किस्सा.
Dashrath Mane -Vishwas Devkate-Ajit Pawar
Dashrath Mane -Vishwas Devkate-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

पुणे : जिल्हा परिषद (ZP) ही मिनी मंत्रालयच आहे. कारण, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) जेव्हा केंद्रीय कृषिमंत्री होते, तेव्हा इंदापूरचे दशरथदादा माने सांगायचे, ‘साहेब देशाचे कृषिमंत्री आहेत आणि मी पुणे जिल्ह्याचा कृषिमंत्री आहे.’ झेडपीचे अध्यक्ष विश्वासरावनाना देवकाते तर म्हणायचं की, मी पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे काय बोलावं आणि काही नाही, अस माझं व्हायचं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्हा परिषदेतील सत्तेची ताकद आधोरेखित केली. (Ajit Pawar told the story of Dashrath Mane and Vishwas Devkate)

पुणे जिल्हा परिषदेच्या हिरक महोत्सवी समारंभाचे आयोजन रविवारी (ता. १ मे) करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यातील ३४ जिल्हा परिषदा सहभागी झाल्या होत्या. त्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अशोक पवार, चेतन तुपे, सुनील टिंगरे उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते.

Dashrath Mane -Vishwas Devkate-Ajit Pawar
बुचकेताई, तुमचं राष्ट्रवादीकडं लक्षच नसतं : अजितदादांचा टोमणा

ते म्हणाले की, जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय समजले जाते. त्यातूनच दशरथदादा माने कृषी व पशुसंवर्धन सभापती असताना ते आपण जिल्ह्याचे कृषीमंत्री असल्याचे सांगायचे. तर विश्वास देवकाते हे अध्यक्ष होते, त्यावेळी तर ते आपण पुणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहोत, असे कार्यक्रमातून सांगायचे. त्यात नाना माझ्याच बारामती तालुक्यातील असल्यामुळे काय बोलायचं आणि काही नाही, असं माझं व्हायचं. उगीच विधानसभेला त्यांनी कुठं काय केलं, तर मला त्रास व्हायचा. त्यामुळे मी समजून घ्यायचो.

Dashrath Mane -Vishwas Devkate-Ajit Pawar
ऐकून तर घे ना शहाण्या...राजन पाटलांसाठी मी साहेबांशी बोलेन..!

सार्वजनिक जीवनात काम करत असताना पदाची अपेक्षा ठेवण्यात गैर नाही. पण, पदासाठी पक्ष आणि मतदारांच्या निष्ठेशी तडजोड होता कामा नये. आपल्यावर जनतेने जी जबाबदारी सोपवली आहे, ती त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली पाहिजे. पण, त्यात सातत्य ठेवले नाही. पद देईपर्यंत त्यांनी चांगलं काम केले. पण, त्यानंतर ते इतके बाजूला गेले. त्याच्या कारणांच्या खोलात मी जाणार नाही. पण, जनता आदर्श पदाधिकाऱ्याला कधी कुठे पाठवयाचे, याचा निर्णय घेत असते. सर्वांना विश्वासात घेत या ठिकाणी कामं करावी लागतात, असेही अजित पवार यांनी बजावून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com