Baramati News : पत्रिकेत नाव छापण्यापुरते पुढारपण काय कामाचे? : पवारांकडून राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी कानउघडणी

एखादा अधिकारी चावटपणा करत असेल तर मी त्याची गय करणार नाही. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

बारामती : कामासाठी बारामतीतील (Baramati) प्रशासकीय भवनामध्ये पैशाची मागणी होते, अशी तक्रार माझ्याकडे आली आहे. त्याबाबत मी स्वतः पाठपुरावा करणार आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. याच मुद्यावरून त्यांनी स्थानिक पुढाऱ्यांनाही झापले. ‘नुसते पत्रिकेत नाव छापण्यापुरते पुढारपण करून उपयोग नाही. तुम्ही तुमचा पूर्णवेळ द्या, असं मी म्हणणार नाही; पण नेतृत्व करताना कष्ट करावे लागतात. पुरेसा वेळ द्यावा लागतो,’ अशा शब्दांत पवारांनी राष्ट्रवादीच्या (ncp) पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. (Ajit Pawar's warning to officials who ask for money for work)

बारामती तालुक्यातील गुनवडी येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी एका पत्राचे जाहीर वाचन केले. रेकॉर्ड रूमध्ये जुने फेरफार, सर्व्हे नंबर, दाखले काढण्यासाठी पैशाची वसुली केली जात आहे, कामासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागते. सॉल्व्हन्सीसाठी तसेच इतर कामासाठी काही हजारांची मागणी केली जाते, हे बारामतीत घडतंय याचं दुःख आहे. सुविधा केंद्रातही पावती दिली जाते, त्यावर रक्कम मांडली जात नाही. भूमीअभिलेख कार्यालयातही पैशांची मागणी केली जाते. विशिष्ट झेरॉक्स सेंटरमधूनच नकाशाच्या प्रती घेण्याचा आग्रह होतो. हे काय चालले आहे.

Ajit Pawar
Dattatray Bharane : ‘१९ वर्षे मंत्री राहूनही काही न करणाऱ्या हर्षवर्धन पाटलांनी ‘लाकडी-निंबोडी’चे फुकटचे श्रेय घेऊ नये’

अजित पवार म्हणाले की, एखादा अधिकारी चावटपणा करत असेल तर मी त्याची गय करणार नाही. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उत्तम सुविधा असणारे कार्यालय तुम्हाला देण्यात आलेले आहे. पण, आता या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरेच बसवतो, म्हणजे समजेल तरी कोण काय करतं आहे ते. तुम्हाला सातवा वेतन आयोगाचा पगार आम्ही देतोय, दीड लाख कोटी रुपये वर्षाचा पगार सरकारी अधिकाऱ्यांना देत आहोत. चुकीचे काम, नियमबाह्य काम करण्यासाठी आम्ही कधीच सांगणार नाही.

Ajit Pawar
Jagtap-Barne News : लक्ष्मण जगतापांसोबतची १० वर्षांची राजकीय दुश्मनी अशी संपवली : खासदार बारणेंनी सांगितली आठवण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही त्रयस्थ म्हणून काय चाललं हे पाहायला हवं, चुकीच काम करणाऱ्यांवर कारवाई, तर चांगले काम करणाऱ्यांना पाठिंबा दिला जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Pankaja Munde News : पंकजाताईंचा होमपिचशी असलेला संपर्क तुटतोय...तर फडणवीसांचा ‘कनेक्ट’ वाढतोय....!

माझ्यापुढ सगळेच सुतासारखे वागतात. माझ्या पाठीला डोळे नाहीत, जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही की कोण कसं वागतंय, तोपर्यंत मला तरी कसं समजणार काय सुरु आहे ते...अशा शब्दांत चुकीचे काम करणारे अधिकारी व पदाधिकाऱ्यांबाबत मला कळवा, सक्त ताकीदच अजित पवार यांनी या वेळी दिला. समजावून सांगू, नाही ऐकल तर पुढची कारवाई करु ना...असेही त्यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com