Ajit Pawar New DCM : अजितदादांसोबत छगन भुजबळही मंत्रिपदाची शपथ घेणार; पवारांचे निकटवर्तीय पटेल, वळसे पाटीलही राजभवनावर

शरद पवार यांचे निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेलही राजभवनावर उपस्थित आहेत.
Chhagan Bhujbal-Ajit Pawar
Chhagan Bhujbal-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politic's : विरोधी पक्षनेते अजित पवार हे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील आठ ते नऊ आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेलही उपस्थित आहेत. (Along with Ajit Dada, Chhagan Bhujbal will also take oath as a minister)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राजभवानाकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत अजित पवार आणि राष्ट्रवादीचे काही आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, अजित पवाार यांच्यासोबत ४० आमदार असल्याचे सांगितले जात आहे. नव्या सरकारमध्ये फडणवीस यांच्यासोबत अजित पवार असे दोघे उमपुख्यमंत्री असणार आहेत.

मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होणार असून त्यात अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून, तर छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेलही राजभवनावर उपस्थित आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील अतुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com