पुणे : कोल्हापूर स्थानिक स्वराज्यसंस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) विजयी झाले होते. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे अमल महाडिक (Amal Mahadik) यांना माघार घ्यावी लागली होती. त्यावेळी अमल महाडिक यांनी माघार घ्यावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी महादेवराव महाडिक यांच्याशीही चर्चा करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यावेळीच्या चर्चेत भविष्यातील राजकारणाचा 'शब्द' ही शहा यांनी दिल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली त्यामध्ये त्यांनी गुलाल उधळला. (Dhananjay Mahadik Latest Marathi News)
त्यामुळे महाडिक कुटुंबाला गेल्यावेळी विधान परिषदेवर पाणी सोडावे लागले होते. मात्र, यावेळी त्यांना थेट राज्यसभा मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेचे धनंजय महाडिक यांचा लोकसभेला आणि अमल महाडिक यांचा विधानसभेला २०१९ मध्ये पराभव झाला होता. तेव्हापासून पराभवाची माळ महाडिक कुटुंबीयांच्या गळ्यात पडत गेली. विधान परिषद, गोकुळ, महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बॅंक अशा संस्थांमध्ये महाडिक कुटुंबीयांना पराभवाचे तोंड पहावे लागले.
मात्र, राज्यसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत महाडिक यांनी पराभवाची मालिका खंडित केली आहे. अमित शहांनी त्यावेळी शब्द दिल्याप्रमाणे भाजपने महाडिक यांना तिसऱ्या जागेवर उमेदवारी दिली. भाजपकडे असलेल्या मतांची संख्या पाहता हा विजय महाडिक यांच्यासाठी कठीण असल्याचे सांगितले जात होते. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या योग्य खेळीमुळे महाडिकांसाठी हा विजय सोपा झाला. त्यांनी शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव केला.
भाजपच्या योग्य नियोजनामुळे महाडिक यांना विजय मिळाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची पराभवाची मालिकाही खंडीत झाल्याने कोल्हापूरमध्ये त्यांना व भाजपला बळ मिळेल असे सांगितले जात आहे. यामुळे आता आगामी मनपा, जिल्हा परिषद, आणि पंचायत समिती निवडणुकीत महाडिक विरुद्ध काँग्रेस नेते व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यात सामना आणखी चुरशीचा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.