बंडखोर एकनाथ शिंदेंमार्फत अमित शहांचा ठाकरेंना `मेसेज` : पंगा घेऊ नका...

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला भाजपचा आशीर्वाद
Eknath Shinde Latest news, Political Crisis in Maharashtra
Eknath Shinde Latest news, Political Crisis in Maharashtra Sarkarnama

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी शिंदेंकरवी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी खास 'मेसेज' धाडला आहे. 'उद्धवजी नको, त्या व्यवस्थेशी (लोकांशी) दुश्मनी घेत आहेत. ती आता परवडणारी नाही,' अशाच शब्दांत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने ठाकरेंना इशारा दिल्याचे पुढे आले आहे. हा दुसरातिसरा नेता कोण नसून खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनीच ठाकरेंना माझा निरोप द्या, असे शिंदेंना बजावल्याचे शिंदेंच्या गोटात असलेल्या एका आमदाराने `सरकारनामाला` सांगितले. (Eknath Shinde Latest news)

अमित शहांच्या या निरोपानंतर उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे. ठाकरे यां विश्वासू, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे आज शिंदे यांना सुरतमधील हाॅटेलमध्ये भेटले. या भेटीचा तपशील विचारण्यासाठी शिंदेंच्या सपंर्कात असलेल्या भाजप नेता त्यांच्याशी बोलला. तसेच हा आमच्या बड्या नेत्याचा हा संदेशही ठाकरेंना पाठवा, असेही या शिंदे यांना या नेत्याने सांगितले.(Political Crisis in Maharashtra)

Eknath Shinde Latest news, Political Crisis in Maharashtra
शिवसेनेला टेन्शन देणारे एकनाथ शिंदे `रिलॅक्स मूड`मध्ये : हाॅटेलमधील `ऑंखो देखा हाल`

भाजप नेत्यांचा हा इशारा ऐकूनच ठाकरेंच्या मर्जीतील आणि मुंबई महापालिकेची तिजोरीची जबाबदारी सांभाळलेल्या यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव याही सुरतमध्ये दाखल झाल्या आहेत. शिंदेंच्या गोटात राहून आपल्या कुटुंबियांभोवतीचा चौकशीचा फास सैल होण्याची आशा जाधव यांना आहे. जाधव या सुरतमध्ये दाखल झाल्याने ठाकरे सरकार फोडण्यासाठी भाजपने केवढी मोठी यंत्रणा लावल्याचे गांभीर्य दिसून येत आहे.

जाधव यांच्यासह कारवायांनी भेदरलेल्या आणि भाजपसोबत घरोबा करण्याच्या तयारीत असलेल्या शिंदे समर्थक आमदारांची यादी ३५ च्या पुढे जाण्याची चिन्हे आहेत. पुढच्या काही तासांत शिवसेना आणि त्यांच्या मित्रपक्षांमधील आमदार फोडाफोडीच्या सत्राला प्रचंड वेग येण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे यांचा मेसेज घेऊन नार्वेकरांनी सुरतमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत बरेच काही दडल्याचा संशय भाजप नेत्यांना आला आणि नार्वेकरांची पाठ फिरताच भाजपच्या एका नेत्याने शिंदेंशी चर्चा केली. या दोघांत बऱ्याच विषयांवर बोलणे, त्यात ठाकरेंची भूमिकाही जाऊन घेण्यात आली. नार्वेकरांच्या मध्यस्थीनंतरही ठाकरे काही माघार घेण्याची शक्यता धूसर असल्याचे शिंदे यांनी भाजप नेत्याच्या कानावर घातले. त्यावर संतप्त झालेल्या भाजपने थेट 'उद्धव ठाकरे उगाचच दुश्मनी घेत आहेत. ती घेऊ नये, हे तुम्ही चांगले पटवून द्या' असे भाजप नेत्याने शिंदेंना सांगितल्याचे समजते.

Eknath Shinde Latest news, Political Crisis in Maharashtra
दहा तासांत एकनाथ शिंदे अनेकदा रश्मी ठाकरेंशी बोलले!

शिंदे आणि त्यांच्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यापासून साऱ्याच बाबींवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची यंत्रणा लक्ष ठेवून आहे. आमदारांची व्यवस्था केलेल्या हाॅटेलला छावणीचे स्वरूप आले आणि तिथे राहण्यासाठी येणाऱ्या लोकांनाही एन्ट्री दिली जात नाही. अर्थात हे हॉटेल 'सील'च केल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांनाही हॉटेलमध्ये लवकर प्रवेश मिळाला नाही. मात्र, नार्वेकर आणि शिंदे यांच्यातील 'दोस्ताना' जाहीर असल्याने नार्वेकरांना फारकाळ ताटकळत न ठेवता, शिंदे यांनी त्यांना हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि शिंदे यांच्यात मोबाईलवरून चर्चा झाली. मात्र त्यानंतर पुन्हा स्वतंत्र इशारारूपी मेसेज देण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com