नितीनजी, तुम्ही रस्ता फार चांगला बांधला, तुम्हाला धन्यवाद : बिग बींनी केले होते गडकरींचे कौतुक

त्यांनी मोठ्या हिंमतीने अनेकांचा विरोध पत्करून द्रूतगती मार्ग पूर्ण केला होता.
 Amitabh Bachchan-Haribhau Bagade-Nitin Gadkari
Amitabh Bachchan-Haribhau Bagade-Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

आळंदी : ‘पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे’ वरून प्रसिद्ध अभिनेते अभिताभ बच्चन यांनी प्रथम प्रवास केला. त्यानंतर या महामार्गाबाबत बच्चन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, मला लक्षात येईना की मी आपल्या देशातल्या रस्त्यावरून प्रवास करतोय की परदेशातील, अशी आश्चर्यजनक भावना त्यांनी गडकरींना प्रत्यक्ष फोन करून बोलून दाखवली होती. तुम्ही रस्ता फार चांगला बांधला, तुम्हाला धन्यवाद,’ अशी आठवण विधानसभचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी या वेळी सांगितली. (Amitabh Bachchan had praised Nitin Gadkari for the Pune-Mumbai road)

सहकार भारतीच्या आळंदीतील महाराष्ट्र प्रदेश अकराव्या त्रैवार्षिक अधिवेशनात आज (ता. ३) हरिभाऊ बागडे यांना (स्व.) अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी बागडे बोलत होते.

 Amitabh Bachchan-Haribhau Bagade-Nitin Gadkari
खानापूरचा पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल

मी विधानसभेत आल्यापासून अनेकदा पुणे-मुंबई रस्ता करण्याबाबत अनेकांच्या घोषणा ऐकल्या होत्या. पण, नितीन गडकरी बांधकाम खात्याचे मंत्री झाले आणि त्यांनी मोठ्या हिंमतीने अनेकांचा विरोध पत्करून द्रूतगती मार्ग पूर्ण केला होता. त्याच पद्धतीने सध्या ते देशभरात रस्त्याचे जाळे विणत आहेत, असे कौतुकोद्‌गार बागडे यांनी काढले. ते म्हणाले की, पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेच्या कामाचे श्रेय अनेकजण घेत आहेत. या महामार्गाला नाव देण्यावरूनही अनेकदा वादंग झाले होते. मात्र हा रस्ता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच केला असल्याचे बागडे यांनी सांगितले.

 Amitabh Bachchan-Haribhau Bagade-Nitin Gadkari
मंगलदास बांदलांच्या सहकाऱ्याला कोरेगावात सापळा रचून पकडले

बागडे म्हणाले, मी १९८५ पासून सभागृहात असल्यापासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे करण्याबाबत ऐकत होतो. तत्कालिन विधान परिषदेचे माजी सभापती जयंतराव टिळक, तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनीही रस्ता करण्याबाबत जाहीर केले होते. एकदा तर जयंतराव टिळक सकाळी पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी निघाले. त्यांना मुंबईत यायला संध्याकाळ झाली. त्यावेळी पवार साहेबांनी सांगितले होते की, रस्ता लवकरात लवकर मोठा करण्यात येईल. पण, तो त्यांच्याही कारकिर्दीत झाला नाही. मात्र, नितिन गडकरी ज्यावेळी बांधकाम खात्याचे मंत्री झाले, त्याचवेळी त्यांनी मोठ्या हिंमतीने अनेक जणांचा विरोध पत्करून हा महामार्ग पूर्ण केला.

नागपूरच्या तरुण भारतमध्ये नितीन गडकरींबाबत खूप माहिती यायची. त्यांच्यावर स्फूट लेख छापून आल्यानंतर त्यांनी आपले वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ते करून दाखवले, असेही बागडे यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com