MCA च्या निवडणुकीत पवार-शेलार गटाचे काळे जिंकले; चर्चा मात्र, संदीप पाटील अन् नार्वेकरांची

MCA Election : प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड झाली.
Ashish Shelar, Sharad Pawar, Sandeep Patil, Milind Narvekar
Ashish Shelar, Sharad Pawar, Sandeep Patil, Milind Narvekar sarkarna
Published on
Updated on

MCA Election : प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अध्यक्षपदासाठी अमोल काळे यांना पाठिंबा होता. दुसरीकडे भारताच्या विश्वविजयी संघातील खेळाडू संदीप पाटील (Sandeep Patil) हे उभे होते.

महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज राजकारणी विरुद्ध खेळाडू असा हा सामना होता. यामध्ये राजकीय नेत्यांचा विजय झाला असला. तरी सुद्धा माजी खेळाडू संदीप पाटील यांच्या नावाची चर्चा मात्र, जोरदार झाली. पाटील यांनी सगळ्या राजकीय मंडळींना अक्षरश: झुंजवले. शरद पवार (Sharad Pawar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आशिष शेलार आणि मुख्यमंत्री शिंदे विरोधात असतानाही पाटील यांना मिळालेली मते ही लक्षणीय आहेत.

Ashish Shelar, Sharad Pawar, Sandeep Patil, Milind Narvekar
ठाकरे गटातील मोठा नेता नाराज?

अमोल काळे यांना 183 तर संदीप पाटील यांना १५८ मते मिळाली. २५ मतांनी काळेंनी संदीप पाटलांचा पराभव केला. सगळी राजकीय मंडळी एका बाजूला गेल्यामुळे हा सामना एकतर्फी होईल, असा अंदाज होता. मात्र, पाटील यांनी जोरदार लढत दिली. एकाएकी झुंज देत त्यांनी मोठ्या नेत्यांना एकत्र येण्यास भाग पाडले. त्यामुळे सोशल मीडियात अमोल काळे विजयी होऊन सुद्धा सर्वाधिक चर्चा संदीप पाटील यांचीच झाली.

दुसरीकडे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी सर्वाधिक मते घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसशी झालेल्या मैत्रीचा नार्वेकरांनी बरोबर फायदा घेतला आणि मुंबई क्रिकेट संघटनेची गणिते बदलून टाकली. राज्यात विशेषत सत्तांतरापासून शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि भाजप नेत्यांमधून विस्तवही जात नाही. अशात क्रिकेटविशवात नार्वेकर यांनी नवीन आघाडी निर्माण केल्याने राजकीय वर्तुळ आवाक झाले आहे.

Ashish Shelar, Sharad Pawar, Sandeep Patil, Milind Narvekar
Kishori Pednekar : नार्वेकर ठाकरेंच्या संस्कृतीत वाढलेले, नाराजीच्या चर्चेवर पेडणेकर म्हणाल्या..

मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे निवडणूक प्रतिष्ठेची झाली...

ही निवडणूक फक्त मुंबईची असली तरी ती अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. शिंदे हे जरी मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक लढवणार नसले तरी त्यांनी शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या गटाला पाठिंबा दिला होता. मात्र, ते फक्त यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पवार-शेलार गटाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही आपली तादक अमोल काळे यांच्यासाठी पणाला लावली होती. त्यामुळे निवडणुकीत अधिक रंगत आली. या सगळ्यांच्या विरोधात संदीप पाटील लढले हे महत्त्वाचे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com