बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि हर्षवर्धन पाटलांचे जावई उतरणार राजकारणात

सध्या तरी राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही. पण, येणार नाही, असंही मी म्हणत नाही.
Nihar Thackeray
Nihar ThackeraySarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नातू आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे जावई निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांनी राजकीय परिस्थितीवर बोलताना एक मोठं विधान केले आहे. सध्या तरी राजकारणात येणाचा कोणताही विचार नाही. पण, येणार नाही, असंही मी म्हणत नाही. जर राजकारणात आलोच तर बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन करीत भविष्यात राजकीय प्रवेशाचे संकेत दिले. (Balasaheb Thackeray's grandson and Harshvardhan Patil's son-in-law will enter politics)

निहार ठाकरे हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात आहेत. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी शिंदे गटासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. त्यामुळे निहार ठाकरे हे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबरोबर भविष्यात राजकीय मैदानात दिसण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार, याचा अंदाज निहार ठाकरे यांनी व्यक्त करताना शिंदे गटाला प्राधान्य दिले आहे.

Nihar Thackeray
केंद्राच्या कररचनेवर शरद पवार नाराज; थेट मोदींवर सोडले टीकास्त्र

इंदापूर येथे पत्रकारांशी संवाद साधत असतांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी राजकारणात सक्रिय होणार का? याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना निहार ठाकरे म्हणाले, ठाकरे गटाने दिलेली 2 लाख 50 हजार प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाने रद्द केली आहेत. त्याबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. ती सर्व प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाच्या नमुन्यात नाहीत. याचा नक्कीच फटका हा उद्धव ठाकरे यांच्या गटाला बसू शकतो, यात प्रमुख मुद्दा असा आहे की, बहुमत कुणाकडे आहे, ज्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांनाच निवडणूक आयोग धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह देईल. या नियमानुसार निवडणूक आयोग बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल, असा विश्वास निहार ठाकरे यांनी व्यक्त केला.

Nihar Thackeray
Cabinet Expansion : शिरसाट, गोगावले, बच्चू कडू यांना मंत्रिपदे निश्चित? : भाजप अन्‌ शिंदे गटाकडून प्रत्येकी चौघांना संधी

आपण राजकारणात प्रवेश करणार का? या प्रश्नावर बोलताना निहार ठाकरे म्हणाले की, मी राजकारणात प्रवेश करणार नाही, असे मी म्हणणार नाही. पण, जर प्रवेश केलाच तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्नशिल राहील. असे म्हणत त्यांनी भविष्यात राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com