भरणेवाडीनं चांगलं मतदान केलं; नाहीतर मी पडलोच असतो : अजितदादांनी सांगितली पहिल्या निवडणुकीची आठवण

मला चेअरमनचं ऐकावंच लागतं; नाहीतर दिगंबर मला परत डायरेक्टर करणार नाही' या कोटीवर अख्खं सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : साखरधंद्याची चांगली माहिती आहे मला. कारण मी लग्न व्हायच्या आधीच छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा (Sugar Factory) डायरेक्टर झालो होतो. भरणेवाडीनं (Bharnewadi) चांगलं मतदान केलं; नाहीतर पडलोच असतो. घोलपसाहेबांच्या पॅनेलमध्ये आमची वर्णी लागली. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या दिलखुलास आठवणीवर सभागृहात हशाचे फवारे उडत होते. पुणे जिल्हा बॅंकेचे (Pdcc Bank) चेअरमन (डॉ. दिगंबर दुर्गाडे) म्हणाले, ‘माझ्यातर्फे वाचनालयाला पन्नास हजार जाहीर करा. मला चेअरमनचं ऐकावंच लागतं; नाहीतर दिगंबर मला परत डायरेक्टर करणार नाही' या कोटीवर अख्खं सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. (Bharnewadi polled well; Otherwise I would have fallen: Ajit Pawar)

बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याच्या व तिरूपती बालाजी मशरूम कंपनीच्या उद्‌घाटनासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार सकाळी सातलाच कार्यक्रमस्थळी पोचले. या कार्यक्रमावेळी सभेत सभागृहातील उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांनी विनोदाची पखरण केली. पवार म्हणाले, "बँकेचे डायरेक्टर म्हणाले वाचनालयास फूल ना फुलाची पाकळी देऊ. जिल्हा बँकेला पाकळी देणं खरं तर शोभत नाही; पण आता काय करणार. चेअरमननेच मला सांगितलं, माझ्यातर्फे पन्नास हजार जाहीर करा. म्हणून मी जाहीर करतोय. नाहीतर दिगंबर मला परत डायरेक्टर करणार नाही. संभाजी (होळकर) आणि दत्तोबा (दत्तात्रेय भरणे) तुम्ही तुमच्या हाताने चेक आणून द्या. तुम्ही फुकट डायरेक्टर झालाय. इथं कारखान्याचं डायरेक्टर व्हायची मारामार असते."

Ajit Pawar
'सोमेश्वरचा सभासद होण्यास अजितदादांची चिठ्ठी लागत नाही; पण इंदापुरात सहकारी कारखाना खासगीप्रमाणे चालवतात'

एका सभासदाने सभासदाचा साखरेचा कोटा वाढवा अशी मागणी केली. यावर, ‘साखर आरोग्यास अपायकारक असते. कारखान्यांचे चेअरमनसुध्दा बिनसाखरेचाच चहा पितात,’’ अशी कोटी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी केली..

Ajit Pawar
माझ्या सभेतील शेवटचा माणूसही उठला नाही; कारण मी गद्दारी केलेली नाही : अजित पवारांनी शिंदेंना सुनावले

‘कारखान्याच्या कामगारांना आधी वसाहत बांधून दिली जाईल. त्यानंतर अधिकारी व सर्वात शेवटी ‘एमडीं’चा बंगला." त्यावर संचालक सुनील भगत म्हणाले, ‘तोवर एमडी रिटायर होतील.’’ मग पवार म्हणाले, ‘‘दुसऱ्या नव्या एमडीला आयतं मिळेल. आताचे एमडी तेव्हा बाहेरून फोटो काढतील आणि म्हणतील हा बंगला माझ्या काळात झाला.’’

Ajit Pawar
संजय गायकवाडांचे पुन्हा वाद्‌ग्रस्त विधान; शिवसेनेला आई म्हणता ना?; मग तिला....

शेतकऱ्यांना सल्ला देताना पवार म्हणाले, "बाबांनो रानात थांबा. धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार, अजित पवारांचं उपमुख्यमंत्रीपद गेलं, आता काय होणार, दिल्लीत काय चाललंय असल्या फंदात जास्त पडू नका.’’

लोक म्हणतील दादाचीच फूस आहे

वाघळवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य ॲड. हेमंत गायकवाड यांनी सभा सुरू असतानाच 'एकच वादा अजितदादा' अशी घोषणा दिली. त्यावर पवार म्हणाले, ‘थांब लका, झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका अजून लांब आहेत. आताच जोर संपल्यावर कसं’ संचालक सुनील भगतांना म्हणाले की, अस्तरीकरण पण तुम्हाला विश्वासात घेऊनच करू. फक्त आता झेडपी बीडपीला दुसरीकडं कुठं फॉर्म भरू नका. माझ्या मांडीला मांडी लावून बसतोय. लोकं म्हणतील दादाचीच फूस आसंल..’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com