Bhima Sugar Factory : पहिल्या फेरीअखेर महाडिकांच्या पॅनेलचा डंका!

मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल दोन फेरीत लागणार आहे. सध्या पहिल्या फेरीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आली आहे.
Bhima Sugar Factory Result
Bhima Sugar Factory Result Sarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या (Bhima Sugar Factory) निकालाच्या पहिल्या फेरीत २८ केंद्रावरील मतमोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामध्ये भाजपचे (BJP) खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांची ‘कपबशी’ (भीमा परिवार पॅनेल) आघाडीवर आहे. त्यामुळे मोहोळ, पंढरपूर तालुक्यातील महाडिक समर्थकांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. (Bhima Sugar Factory Result : Mahadik's panel leading at end of the first round)

मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल दोन फेरीत लागणार आहे. सध्या पहिल्या फेरीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. पहिल्या फेरीत २८ केंद्रावरील ७५०० मतांची मोजणी होत आलेली आहे, दुसऱ्या फेरीतही तेवढच मतदान आहे. पहिल्या फेरीच्या अंतिम मतमोजणीपर्यंत महाडिक गटाची आघाडी कायम असल्याचे चित्र आहे.

Bhima Sugar Factory Result
Bhima Sugar Factory Result : धनंजय महाडिक गटाचे उमेदवार पहिल्या टप्प्यात आघाडीवर

पहिल्या फेरीत जवळपास ७५०० मतांची मोजणी सुरू आहे. ती सध्या अंतिम टप्प्यात आहे. आंबेचिंचोली, पुळूज, पुळूजवाडी, फुलचिंचोली, शंकरगाव, विटे, उचेठाण, ब्रम्हपुरी, औंढी, टाकळी सिकंदर, पेनूर, पाटकूल, वरकुटे, तांबोळे, सौंदणे, मगरवाडी व तारापूर या केंद्रवरील मतमोजणी काही वेळेत पूर्ण होणार आहे.आतापर्यंतच्या मतमोजणीत खासदार धनंजय महाडिक यांची ‘कपबशी’ (भीमा परिवार पॅनेल) आघाडीवर आहे.

Bhima Sugar Factory Result
Bhima Sugar Factory : भीमा कारखान्यासाठी ७९ टक्के मतदान; कौल पाटील-परिचारकांना की पुन्हा महाडिकांनाच?

दुसऱ्या फेरीत तुंंगत, सुस्ते, अंकोली, अर्धनारी, इंचगाव, वडदेगाव, बेगमपूर, वाघोली, शेजबाभूळगाव, येणकी, विरवडे बुद्रूक, कोथाळे, काटेवाडी, कुरुल, सोहाळे, वडवळ, ढोकबाभूळगाव, पोखरापूर, गोटेवाडी, नजिक-पिंपरी, पापरी, येवती, कोन्हेरी, खंडाळी आणि भीमा कारखाना कॉलनी या केंद्रांवरील मतमोजणी होणार आहे.

Bhima Sugar Factory Result
घोडगंगा कारखान्याचे चेअरमन ठरले : उपाध्यक्षपदासाठी ही नावे आघाडीवर!

या निवडणुकीत एकूण १९ हजार ४३० पैकी १५ हजार ३२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पहिल्या फेरीत महाडिक गटाने आघाडीत घेतली आहे. मोहोळ, पंढरपूर तालुक्यातील महाडिक समर्थकांनी जल्लोषाची तयारी केली आहे. तर दुसऱ्या फेरीत आम्हीच बाजी मारू, असा दावा माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्या गटाकडून करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com