भाजपने वाढविले गवळी, बारणे, किर्तीकरांसह शिंदे गटाच्या पाच खासदारांचे टेन्शन

भाजपने लोकसभा प्रवास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत केंद्रीय मंत्र्यांकडे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Gawli, Barne, Kirtikar, Tumane, Godse
Gawli, Barne, Kirtikar, Tumane, GodseSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे ध्येय भारतीय जनता पक्षाने (BJP) ठेवले आहे, त्यासाठी भाजप आतापासूनच कामाला लागला आहे. पण, लोकसभा निवडणुकीची तयारी करताना भाजपने मित्रपक्षाच्या मतदारसंघावरही डोळा ठेवल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील खासदारांच्या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे (Shrirang Barne), गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) , कृपाल तुमाने (Krupal Tumane), भावना गवळी (Bhavana Gawli), हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचे टेन्शन वाढविले आहे. आता मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप यातून कसा मार्ग काढणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (BJP increased the tension of Gawli, Barne, Kirtikar, Godse, Tumane)

भाजपने लोकसभा प्रवास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत केंद्रीय मंत्र्यांकडे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. यात ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याकडे विदर्भातील भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा आणि रामटेक या सात मतदारसंघाचे प्रभारीपद सोपविण्यात आले आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडे लातूर आणि मावळ, पियूष गोयल यांच्याकडे ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबई, नारायण राणेंकडे सांगली, डॉ. भागवत कराड यांच्याकडे परभणी व धुळे, कपिल पाटील यांच्याकडे सोलापूर, तर डॉ. भारती पवार यांच्याकडे नाशिकच्या प्रभारीपदाची जबाबदारी असणार आहे. यातील बहुतांश मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. मात्र, काही मतदारसंघ हे मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचे आहेत.

Gawli, Barne, Kirtikar, Tumane, Godse
‘त्या’ बंडखोर १६ आमदारांना निलंबित करावेच लागणार : महाराष्ट्रातील बड्या नेत्याने स्पष्टच सांगितले

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष संघटना बांधणीसाठी लोकसभा प्रवास योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत ज्या केंद्रीय मंत्र्यांकडे मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यातील नाशिक, मावळ, उत्तर पश्चिम मुंबई, रामटेक, यवतमाळ या लोकसभा मतदारसंघात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे अर्थात शिंदे गटाचे खासदार आहेत. सध्या शिंदे गटाबरोबर भाजप राज्यात सत्तेत आहे. असे असूनही भाजपने या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देऊन भाजप मजबूत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Gawli, Barne, Kirtikar, Tumane, Godse
Bhagat Singh Koshyari : कोश्यारी भाजपलाही नकोसे झालेत : राज्यपालांना हटविण्यामागे ‘हा’ आहे डाव

मावळमध्ये श्रीरंग बारणे, नाशिकला हेमंत गोडसे, यवतमाळमध्ये भावना गवळी, उत्तर पश्चिम मुंबईत गजानान किर्तीकर, रामटेकमध्ये कृपाल तुमाने हे एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत. मात्र, भाजपने या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची तयारीसाठी मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मित्रपक्षाला गिळकृंत करणार पक्ष असा आरोप भाजपवर त्यांच्या मित्रपक्षांकडूनच अनेकदा झालेला आहे, त्यासाठी महाराष्ट्रात शिवसेना, पंजाबमध्ये अकाली दल, बिहारमध्ये जदयूचे उदाहरण दिले जाते. युतीत असताना भाजपने आपले उमेदवार पाडल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. याआगोदर तर खुद्द कल्याण लोकसभा मतदारसंघावरही भाजपने दावा केला होता. तसेच, त्या ठिकाणी पक्षवाढीचे काम सुरू केले होते. त्यामुळे पूर्वी शिवसेनेते असलेले शिंदे आणि त्यांचे खासदार यातून कसा मार्ग काढतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com