BJP NEWS : भाजपचं विधानसभेला मिशन-200 : बावनकुळेंनी सांगितली निवडणूक रणनीती

आगामी २०२४ च्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार तसेच अकरा आमदार भाजप-शिवसेना युतीचेच निवडून येतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
Chandrashekhar bawankule
Chandrashekhar bawankuleSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ६० हजार जणांना भारतीय जनता पक्षाशी जोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र विधानसभेत 200 जागा स्वबळावर निवडून याव्यात, अशी रचना आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापुरात बोलताना दिली. (Chandrashekhar Bawankule told BJP's election strategy)

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे आज सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर आहेत. सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्ष संघटना आणि निवडणूक रणनीती याबाबत भाष्य केले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपकडून (BJP) सुरू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे बोलत होते.

Chandrashekhar bawankule
Solapur Loksabha : सोलापूर राष्ट्रवादीकडे घ्यायचा तर ‘या’ तीन मतदारसंघाची माहिती काढा : पवारांचा आदेश

ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने सर्वसामान्यांसाठी ज्या विकासात्मक योजना राबविण्यात येत आहेत, त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम पक्षाचं आहे. या दृष्टीने कार्यकर्ते कायमस्वरूपी प्रयत्नशील आहेत, सर्व कामे जनतेपर्यंत पोहोचवू आणि विकास कामावर मत मागू. आम्हाला आमच्यावर कामावर मतदान मिळेल, कोणावर टीका करून मत मिळवायची गरज आम्हाला भासणार नाही.

Chandrashekhar bawankule
Karnataka Election Politics: त्रिशंकूच्या शक्यतेने कर्नाटकात राजकीय हालचाली वाढल्या; काँग्रेस-भाजपचा धजदच्या आमदारांवर डोळा

जिथे आमचे आमदार नाहीत, त्या मतदारसंघात आमचा आमदार निवडून येण्याच्या दृष्टीने पुढील काळात प्रयत्न राहतील. सर्व २८८ मतदार संघाचा प्रवास मी करणार आहे. एका विधानसभा मतदारसंघाला सहा तास देणार आहे, अशी माहितीही बावनकुळे यांनी सांगितली.

भाजपची स्थानिक नेतेमंडळी, पदाधिकारी आणि बूथपर्यंतच्या कार्यकर्त्यांचा जनसंपर्क, कामामुळे आगामी २०२४ च्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार तसेच अकरा आमदार भाजप-शिवसेना युतीचेच निवडून येतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Chandrashekhar bawankule
Solapur News : अजितदादा गेल्या सहा महिन्यांत आम्हाला कधीही भेटले नाहीत; पण... : बावनकुळेंनी टाकली ठिणगी

राज्यातील डबल इंजिनचे सरकार महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाईल, असा जनतेमध्ये विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या कामावरच मतदान मिळेल, कोणावर टीका करून मत मिळवायची गरज आम्हाला भासणार नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com