CJI Dhananjay Chandrachud Habits :
CJI Dhananjay Chandrachud Habits :Sarkarnama

CJI Dhananjay Chandrachud Habits : शांत आणि कडक शिस्तीच्या धनंजय चंद्रचूड यांच्या खास गोष्टी माहिती आहेत?

Dhananjay Chandrachud Latest News : भारतीय न्यायालयांमध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत
Published on

Justice Dhananjay Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्याबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकत असतो, पण त्यांचे खासगी जीवन कसे आहे, त्यांच्या आवडी-निवडी कशा आहेत. ते खासगी जीवनात कसे आहेत, याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. शांत आणि कडक शिस्तीचा स्वभाव अशी सर्वसाधारणपणे चंद्रचूड यांची ओळख आहे. पण त्यांच्या शांत स्वभावामागे अनेक गोष्टी दडल्या आहेत, धनंजय चंद्रचूड यांनी संगीत ऐकण्याची आणि पुस्तके वाचण्याची आवड जोपासली आहे, असे सांगितल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे.

भारतीय न्यायालयांमध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत. 1 जुलै 2022 पर्यंत एकट्या सर्वोच्च न्यायालयात 69,766 खटले प्रलंबित होते. अशा परिस्थितीत न्यायाधीशांवर जास्तीत जास्त खटले निकाली काढण्यासाठी दबाव असतो, पण या कामाच्या दबावातही भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आवर्जून पुस्तक वाचन आणि संगीत ऐकतात.

CJI Dhananjay Chandrachud Habits :
Chhagan Bhujbal Bungalow Security : भुजबळांच्या बंगल्यावर शुकशुकाट; पण पोलिसांचा कडक पहारा

गाणी ऐकण्याची आणि पुस्तके वाचण्याची आवड

सरन्यायाधीशपदाची जबाबदारी आल्यानंतर चंद्रचूड यांच्यावरील कामाचा ताण वाढला, पण यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप बदल झाले आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे मला पुस्तकाची तीस पानेही वाचता येत नाहीत. त्यामुळे मी दहाच पाने वाचून झोपतो, असे चंद्रचूड यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रचूड यांनी त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या.

फावल्या वेळात काय करतात?

या प्रश्नावर बोलताना चंद्रचूड म्हणाले, मला संगीत ऐकायला आवडते. लहानपणापासूनच मला शास्त्रीय संगीताची आवड होती. जी आजही कायम आहे. भारतीय आणि पाश्चात्य असे दोन्ही प्रकारचे शास्त्रीय संगीत ऐकायला मला आवडते. मी कधी कधी रॉक आणि पॉप संगीतदेखील ऐकतो. बॉब डायलन, डायर स्ट्रेट्स आणि ॲडेल यांचे संगीत ऐकायला आवडते.

CJI Dhananjay Chandrachud Habits :
Strong Decision : पोलिसांच्या नोटीसला नाही घाबरणार; नेत्यांच्या घरापुढं आंदोलन करणार

कोर्टात जाताना-येताना गाणी ऐकतो

माझ्या मुली माझ्या फोनवर काही गाणी डाउनलोड करतात, ती गाणी मी कोर्टात जाताना आणि येताना ऐकत असतो. माझ्या मूडनुसार मी कोणत्या प्रकारचे संगीत ऐकायचे ते ठरवतो. कधी कधी मला फक्त काही चांगला पियानो ऐकावासा वाटतो. खरंतर, कोणत्या प्रकारचे संगीत ऐकायचे हे माझ्या मूडनुसार बदलत असते. मी न्यायालयात कोणत्या प्रकारचे काम करत आहे यावर ते अवलंबून असते. तसेच त्या विशिष्ट क्षणी माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे. कधीकधी मनाला आनंद देणारे संगीत ऐकावेसे वाटते, तर कधी उत्साहवर्धक संगीत ऐकावेसे वाटते, असेही चंद्रचूड सांगतात.

लहानपणापासून जपली शास्त्रीय संगीताची आवड

डी. वाय. चंद्रचूड यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या पालकांनी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले होते. चंद्रचूड स्वतः बालपणी हार्मोनियम आणि तबला वाजवायला शिकले होते. चंद्रचूड इतक्या उत्तम प्रकारे तबला वाजवायला लागले होते की, पुढे आपला मुलगा कदाचित तबलावादक होईल, अशी भीती त्यांच्या वडिलांना वाटू लागली होती.

Edited By- Anuradha Dhawade

CJI Dhananjay Chandrachud Habits :
Manoj jarange On Fadnavis : 'गृहमंत्री फडणवीसांना माझे मराठे संरक्षण देतील, त्यांनी चर्चेसाठी यावं'; जरांगेंची स्पष्टोक्ती !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com