पुणे : ‘नवी सहकार नीती बनविण्यासाठी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांच्या नेतृत्वाखाली एक समिती (Committee) स्थापन करण्यात आली आहे. ती समिती लवकरच नवा सहकार मसुदा बनवेल. तो मसुदा जनतेसमोर ठेवण्यात येईल. जनतेच्या योग्य सूचनांचा अंतर्भाव करून नवी सहकार नीती बनविली जाईल. ती सहकार नीती ‘सहकार क्षेत्राची (cooperative Sector) पुढील २० वर्षांची दिशा निश्चित करेल,’ असे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सांगितले. (Committee headed by Suresh Prabhu to formulate new co-operative policy : Amit Shah)
सकाळ समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहकार महापरिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात शहा यांनी ही माहिती दिली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार उपस्थित होते.
अमित शहा म्हणाले की, राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी सहकार बँकांची सुरुवात केली. त्याआधीपासूनच महाराष्ट्राचा स्वभाव सहकाराचा राहिला आहे. विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाडगीळ, वैकुंठ मेहता आणि अमूलचे संस्थापक त्रिभुवनदास पटेल यांचं सहकारात मोठं योगादन आहे. हे सर्वजण जुन्या मुंबई राज्याशी निगडीत होते. तळागाळापर्यंत सहकार क्षेत्र पोचविण्यात महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे.
सहकार मंत्रालय वेगळे करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. एवढं मोठं मंत्रालय सचिव बघणार, हे योग्य वाटत नव्हते. मोदी सरकारने सहकार मंत्रालय अस्तित्वात आणण्याचे ठरविले. ते पूर्ण करून पहिला सहकार मंत्री बनण्याचे भाग्य मला मिळाले. सहकार से समृद्धी यासाठी मोदी सरकारने सहकार मंत्रालय निर्माण केले आहे. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राचे योगदान देशात मोठे आहे. सहकार क्षेत्राचा मोठा पाया महाराष्ट्रात आहे, असेही शहा यांनी नमूद केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.