एकाच घरात राष्ट्रपती अन्‌ पंतप्रधान; पण त्यासाठी उद्धव ठाकरेंना साकडे!

दत्ता चौधरी यांनी मुलाचे नाव ठेवले पंतप्रधान; जन्मदाखल्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली कैफियत
pantpradhan
pantpradhanSarkarnama
Published on
Updated on

उमरगा : उमरगा तालुक्यातील चिंचोली (भुयार) येथील दत्ता चौधरी यांनी पाळण्यात मुलाचे नाव पंतप्रधान ठेवले. पण, आता जन्मदाखला लालफितीत अडकला आहे. प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने चौधरी यांनी शुक्रवारी (ता. ११ फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे ईमेल करून कैफियत मांडली आहे. शिवाय ‘पंतप्रधान’ नावाने जन्म दाखला देण्याची मागणी केली आहे. (Complaint to Chief Minister Uddhav Thackeray for child birth certificate)

चौधरी यांनी पहिल्या मुलाचे नामकरण ‘राष्ट्रपती’ केल्याने चर्चेचा विषय झाला होता. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या मुलाचे नामकरण पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला. मुस्ती (जि. सोलापूर) येथे २१ नोव्हेंबर रोजी मुलाचे नाव ‘पंतप्रधान’ ठेवण्याचा विधी (पाळण्याचा) कार्यक्रम झाला. बोरामणी (जि. दक्षिण सोलापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने जन्म दाखला देण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले आहे.

pantpradhan
सूर्यकांत दळवींना यापुढेही आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न करू : परबांनी रामदास कदमांना पुन्हा डिवचले!

दत्ता चौधरी यांना १९ जून २०२० रोजी पहिला मुलगा झाला. त्यांनी त्या बाळाचे नामकरण राष्ट्रपती असे केले आणि बाळ सोलापूर शहरात जन्मल्यामुळे महापालिकेतून ‘राष्ट्रपती दत्ता चौधरी’ या नावाने जन्मप्रमाणपत्र काढले. शिवाय आधार कार्डही काढून घेतले होते. दरम्यान, चौधरी आणि कविता चौधरी यांना १० नोव्हेंबर २०२१ रोजी दुसरा मुलगा झाला. मुस्ती येथे सासुरवाडीत ता. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी आई कविता व महिला भगिनींनी बाळाचे कान फुंकून पंतप्रधान असे नाव ठेवले.

pantpradhan
पुणे झेडपीने निलंबित केलेले वाबळेवाडी शाळेचे वारे गुरुजी बनले मंत्र्यांचे ओएसडी!

दरम्यान, आता पंतप्रधानपद संविधानिक असल्याने त्याचा जन्म दाखला द्यावा की नाही, याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ‘पंतप्रधान दत्ता चौधरी’ या नावाचा जन्म दाखला मिळण्यासाठीचा चौधरी यांचा अर्ज लालफितीत अडकला आहे. त्यामुळे चौधरी यांना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल पाठवून जन्म दाखला मिळत नसल्याची कैफियत मांडून जन्म दाखला मिळण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com