पुणे : Har Ghar Tiranga स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ता घरोघरी तिरंगा फडकविला जात आहे. (15 Aug Celebration) मात्र हा तिरंगा अनेक ठिकाणी सदोष असल्याचे दिसून आले आहे. उद्योगपती आनंद महिंद्र (Anand Mahindra) यांनी तिरंगा हातात घेतलेला फोटो सोशल मिडियावर टाकलेला आहे. मात्र तो सदोष असल्याचा आक्षेप ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagale) यांनी घेतला आहे.
निखिल वागळे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ``हा झेंडा सदोष आहे हे उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या लक्षात आलेलं दिसत नाही. वरची केशरी रंगाची पट्टी पहा. अशा असंख्य झेंड्यात गफलती आहेत. कधी रंगाच्या पट्ट्या चुकीच्या तर कधी अशोकचक्राची जागा चुकवलेली. राष्ट्रध्वजाचा घाऊक बाजार मांडला तर दुसरं काय होणार? म्हणूनच कदाचित खादी ग्रामोद्योगने असे लाखो झेंडे बनवण्यात आपण सक्षम नाही असं सांगितलं. ( आणि खाजगी व्यापाऱ्यांचे खिसे भरले गेले!)``
वागळे यांच्या पोस्टवर नंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अनेक ठिकाणी कसे सदोष झेंडे तयार झाले आहेत, त्याची उदाहरणे दिली आहेत.
ध्वजसंहिता काय सांगते?
राष्ट्रध्वज फडकविताना प्रत्येक नागरिकाने कटाक्षाने राष्ट्रध्वजाचा सन्मान करत ध्वजसंहितेचे पालन करावे, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. याबाबत काही सूचना केल्या आहेत.
घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वज फडकविताना हाताने कातलेल्या, विणलेल्या किंवा मशीनद्वारे सुत, पॉलिस्टर, सिल्क, खादी, लोकरपासून तयार केलेला वापरावा.
राष्ट्रध्वज हा 3:2 या प्रमाणात असावा. केशरी रंग वरच्या बाजुने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजुने राहील याप्रमाणे फडकवावा.
राष्ट्रध्वज उतरवतांना सावधतेने व सन्मानाने उतरवून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. राष्ट्रध्वज कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही याची काळजी घ्यावी.
राष्ट्रध्वज फडकवताना पुढील गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.
प्लास्टिक किंवा कागदी ध्वज वापरु नये. कोणत्याही सजावटी वस्तू लावू नयेत.
राष्ट्रध्वज फडकवितेवेळी फुलांच्या पाकळ्या ठेऊ नयेत.
राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर किंवा चिन्ह काढू नये.
राष्ट्रध्वज फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये.
एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर राष्ट्रध्वज फडकवू नये.
तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून अन्य कोणत्याही प्रकारचे शोभेसाठी राष्ट्रध्वजाचा उपयोग करु नये.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.