Demonetization History : स्वातंत्र्यापूर्वी अस्तित्वात होती तब्बल १० हजाराची नोट, रोतोरात झाली नोटबंदी; इतिहास काय सांगतो?

Reserve Bank Of India : पाच दहा हजारांच्या नोटांचा काळ कसा होता?
Demonetization History : Ten Thousand Rupees note
Demonetization History : Ten Thousand Rupees note Sarkarnama

Demonetization History : भारतीय रिझर्व्ह बँकने काल शुक्रवारी (दि. १९ मे) रोजी दोन हजार रुपयांच्या नोटेला चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे २०१६ या वर्षीच्या नोटबंदीच्या स्मृती जाग्या झाल्या. अशाच प्रकारचा एक २०१३-१४ ला निर्णय घेण्यात आला होता, असे देखील आरबीआयने स्पष्ट केले आहे. यावेळी २००५ या वर्षापूर्वी छपाई करण्यात आलेल्या नोटा चलनातून बाद ठरवले होते.

नोटबंदीचा इतिहास :

नोटांना चलनातून बाद करण्याचा हा इतिहास हा स्वातंत्र्याच्या आधीची कालखंडापासून सुरू आहे. पहिल्यांदा नोटबंदी करण्याचा निर्णय १९४६ या वर्षी घेण्यात आला होता. तेव्हाचे ब्रिटिश सरकारचे गव्हर्नर जनरल सर आर्चीबाल्ड यांनी ही नोटबंदी लादली होती. १२ जानेवारी १९४६ रोजी अधिक मूल्यांच्या नोटांना बंद करण्याचा अध्यादेश जाहीर केला होता.

Demonetization History : Ten Thousand Rupees note
PCMC : महापालिका कर्मचाऱ्यांचा डबल धमाका ; 50 हजार ते अडीच लाख रुपये बोनस मिळणार

ब्रिटीश सरकारच्या या आदेशान्वये २६ जानेवारी १९४६ रोजी तेव्हा प्रचिलित असलेल्या ५००, १००० आणि १०,००० रुपयांच्या नोटा (ten thousand rupee note India) चलनातून एकाएकी बाद ठरवल्या होत्या. १०० रूपयांपेक्षा अधिक किमतीच्या नोटांवर बंदी टाकण्यात आली होती.

काळा पैसा संपवण्याचा उद्दीष्ट :

यात विशेष गोष्ट म्हणजे, ब्रिटिश सरकारकडून घेण्यात आलेल्या नोटबंदीचा निर्णय हा देखील काळ्या पैशांवर प्रहार करण्यासाठी होता. भारतीय व्यापाऱ्य़ांना त्या वेळी, ब्रिटीश सरकारचा कर चुकवून भरभक्कम पैशाचा साठा केल्याचा संशय सरकारला होता. याच पैशांवर प्रहार करण्यासाठी, हा काळा पैसा नष्ट करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला होता.

Demonetization History : Ten Thousand Rupees note
Yavatmal District News : तुळशीनगरच्या सरपंच, उपसरपंचासह चार सदस्य अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाने खळबळ !

१९७८ सालची नोटबंदी :

स्वातंत्र्यापूर्वीच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर पुढची नोटाबंदी स्वातंत्र्यानंतर थेट १९७८ या वर्षी पुन्हा एकदा नोटबंदीचा निर्णय (Demonetization in 1978) घेतला होता. यावेळी देशामध्ये जनता पार्टीचे सरकार अस्तित्वात होते. तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सरकारमध्ये येताच एका वर्षाच्या आतच हा क्रांतीकारी निर्णय घेतला होता. मागील सरकारमध्ये काही भ्रष्ट लोकांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे, तेव्हाच्या मोरारजी सरकारने सांगितले होते.

१४ जानेवारी १९७८ या दिवशी मोठ्या व अधिक मूल्यांच्या नोटा बंद करण्याचा विचार प्रस्थावित असल्याचे सरकारने आरबीआयला सांगितले. यानुसार आरबीआयने नोटा चलनातून हद्दपार करण्यात आल्याचे अध्यादेश काढण्यात आले. आणि तेव्हाचे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी या अध्यादेशावर स्वाक्षरी करत, या निर्णयाला मान्याता दिली.

हा निर्णय संमत झाल्यानंतर १६ जानेवारी १९७८ या दिवसापासून १०००, ५००० आणि १०,००० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्यात आल्या होत्या. मुख्य म्हणजे १६ जानेवारी रोजी सकाळीच आकाशवाणीवरून या अभूतपूर्व निर्णयाची घोषणी करण्यात आली होती.

२०१६ ची नोटबंदी :

२०१४ या वर्षी देशात सत्तांतर घडून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वात भाजप सरकार पूर्ण बहुमतात आले होते. २०१६ या वर्षी मोदी सरकारकडून नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. मोदींच्या या तडकफडकी निर्णयामुळे ८ नोव्हेंबर २०१६ या दिवसापासून ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद ठरवण्यात आले. त्या बदल्यात ५०० रुपयांची नवी नोट आणि १००० च्या बदल्यात २००० रूपयांची नवी नोट आणली गेली.

Demonetization History : Ten Thousand Rupees note
RBI on 2000 Note Demonetize : दोन हजारांच्या नोटांचे भारतीय चलनात सध्या केवळ अडीच लाख कोटी रुपये !

अवैध पैशांवर प्रहार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे, या दरम्यान चर्चा होती. मात्र आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार ५०० आणि १००० च्या ९९ टक्के नोटा बँकेत जमा झाल्या होत्या. आरबीआयने (RBI) दिलेल्या माहितीनुसार ५०० आणि हजार रुपयांच्या ९९ टक्के नोटा बँकेत परत आल्या होत्या.

मोदी सरकारच्या या नोटबंदीवर विरोधकांनी वारंवार टीका केली होती. यानंतर आता काल दि. १९ मे रोजी आरबीआयने २००० रूपयांच्या नोटा बंद करण्यात आल्याचे सांगितले आहे. २००० च्या नोटा आजपासून चलनातून बाद ठरवण्यात येत आहेत, असे आरबीआयने म्हंटले आहे. २३ सप्टेंबर २०२३ पर्यंत नोटा बदलण्याची मुदत देण्यात आली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com