इकडं ईडी, इन्कम टॅक्स आहे...त्यांचेच काही दोस्त जेलमध्ये जाऊन बसले आहेत’

आम्ही काय कोणाला बुडवाबुडवीच्या भानगडीत नाही. पण, त्यांनी (दिलीप सोपल) भाषा काय वापरली, आर्यन शुगर्स माझा काही संबंध नाही. मग संबंध कोणाचा आहे.
Dilip Sopal-Rajendra Raut
Dilip Sopal-Rajendra RautSarkarnama

सोलापूर : माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांच्या वयाचा विचार करून मी मान-सन्मान ठेवत होतो. पण, एवढीच मग्रुरी असेल तर इकडे ईडी (ED), इन्कम टॅक्स (Income Tax) आहे. कोणं, कोणं, कुठं, कुठं जाऊन बसायला लागले आहेत, हे त्यांनाही माहिती आहे. त्यांचेच काही दोस्त जेलमध्ये जाऊन बसले आहेत, असा सूचक इशारा बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी नाव न घेता दिलीप सोपल यांना दिला आहे. (Dilip Sopal's Some friends have gone to jail : Rajendra Raut)

आर्यन शुगरला दिलेल्या कर्जाशी माझा काही संबंध नाही, असे विधान माजी मंत्री दिलीप सोपल यांनी केले होते. त्याबाबत बोलताना आमदार राऊत यांनी सोपल यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की ‘आर्यन शुगर्स’शी तुमचा संबंध नाही, तर कोणाचा आहे? सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून आर्यन शुगरमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची आम्ही पोलिसांत तक्रार दिली आहे. पुढच्या आठवड्यात मी स्वतः सक्तवसुली संचनालयाकडे (ईडी) तक्रार देणार आहे. शेतकऱ्यांचा एक ना एक पैसा वसूल केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

Dilip Sopal-Rajendra Raut
नाराज आमदारांच्या पुन्हा गुप्त बैठका; शिंदे-फडणवीसांनी गुप्तचर यंत्रणा लावली कामाला

सोपल हे सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे संचालक असताना ‘आर्यन शुगर्स’ या कारखान्याला कर्ज दिले होते. साखर कारखाना बुडीत निघाल्यावर त्यांनी हात वर केले आहेत. आर्यन शुगर कारखान्यामधील कामगार, ज्या शेतकऱ्यांचा ऊस गाळप केला आहे, त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, त्यामुळे याची तक्रार लवकरच मी ईडीकडे देणार आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

Dilip Sopal-Rajendra Raut
पवारांचे निमंत्रण नाकारणारा ब्राम्हण महासंघ चंद्रकांतदादांच्या बैठकीस हजेरी लावणार

आमदार राऊत म्हणाले की, आम्ही काय कोणाला बुडवाबुडवीच्या भानगडीत नाही. पण, त्यांनी (दिलीप सोपल) भाषा काय वापरली, आर्यन शुगर्स माझा काही संबंध नाही. मग संबंध कोणाचा आहे. आम्हाला लिहून द्यायला बॅंकेचे अधिकारी काय वेडे आहेत का? याबाबतचा विषय सध्या न्यायालयात आहे. लोकप्रतिनिधी असताना ह्यांनी बार्शी तालुक्याचा विकास केलेला नाही. कोणतेही विकासाचे काम आणले तर त्यात अडथळे आणण्याचे काम त्यांनी केले आहे. एवढं करूनही लोकांचं पैसे बुडवायचे आणि दुसऱ्यांच्या नावाने बोंबा मारायच्या, हे या पुढे चालणार नाही.

Dilip Sopal-Rajendra Raut
फडणवीसांना पुण्यातून दिल्लीला पाठवा : ब्राह्मण महासंघाची सर्वांत आधी मागणी

आमदार राजेंद्र राऊतांनी भाजपच सहयोगी सदस्यत्व स्वीकारलं आहे आणि सोपलांना ईडीची धमकी दिली आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारण आगामी काळात ढवळून निघाण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com