27 September in History : इथपासूनच झाली महाराष्ट्राच्या अस्थिर राजकारणाची सुरुवात

Dinvishesh 27 September : खरंतर नंतरच्या काळात राजकारण खूपच अस्थिर बनलं...त्याची सुरुवात याच काळात झाली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. या सगळ्याचे वार्तांकन 27 सप्टेंबर, 2014च्या 'सकाळ'च्या अंकात दिसते....
Dinvishesh 27 September
Dinvishesh 27 SeptemberSarkarnama
Published on
Updated on

2014 ची विधानसभा निवडणूक. त्यावेळी एकत्र असलेल्या शिवसेना भाजपच्या युतीत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत बऱ्याच घडामोडी घडत होत्या. एकत्र असलेल्या या सर्वच राजकीय पक्षांच्या महत्त्वाकांक्षेला नवे धुमारे फुटले होते. कुणाला कुठल्या आणि किती जागा मिळाव्यात यावरून एकमत झाल्यानंतर या सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

25 सप्टेंबरच्या रात्री अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने तत्कालीन आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. या घडामोडीनंतर २६ सप्टेंबरच्या सकाळी चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा तेव्हाचे राज्यपाल सी. विद्यासागर यांच्याकडे सुपूर्द केला.

Dinvishesh 27 September
26 September in History : त्यावेळी स्वबळावर, यावेळचं काय?

त्यावेळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तत्कालीन परिस्थितीवर एक अचूक भाष्य केले होते. ते म्हणाले होते, "सर्वच पक्ष स्वबळावर लढत असल्याने उमेदवारांचे पीक चांगले आले आहे. अर्थात, यातूनव मतदारांनी चांगले पीक शोधून तणकट खुरपून काढावे,"

खरंतर नंतरच्या काळात राजकारण खूपच अस्थिर बनलं...त्याची सुरुवात याच काळात झाली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये.

या सगळ्याचे वार्तांकन 27 सप्टेंबर, 2014च्या 'सकाळ'च्या अंकात दिसते....

27 September 2024 dinvishesh
27 September 2024 dinvisheshSarkarnama

आजचे दिनविशेष - 27 सप्टेंबर

  • 1833 - ब्राह्मो समाजाचे संस्थापक, वृत्तपत्रकार व सतीची प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करणारे थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचे निधन.

  • 1925 - डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

  • 1929 - "काळ' या नितयकालिकाचे संस्थापक संपादक शिवराम महादेव परांजपे यांचे निधन.

  • 1992 - महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील थोर तपस्विनी अनुताई वाघ यांचे निधन.

  • 2001 - पाच दशकांहून अधिक काळ आंध्र प्रदेशच्या राजकारणावर ठसा उमटविणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री के. विजयभास्कर रेड्डी यांचे निधन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com