Bacchu kadu News : 'कोल्हाट्याचं पोर' पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळेंच्या आईला अखेर बच्चू कडू देणार न्याय

Bacchu kadu News : कडू यांची 'प्रहार' आता शांताबाईंच्या मदतीला धावून आली आहे.
Bacchu Kadu News
Bacchu Kadu NewsSarkarnama
Published on
Updated on

Bacchu kadu News : 'कोल्हाट्याच पोर' या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळे यांच्या आई आणि लोककलावंत शांताबाई काळे यांना 'कोणी घर देत का घर' असं म्हणण्याची वेळ आली होती. त्यांना आता माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) मदत करणार आहेत.

कडू यांची 'प्रहार' आता शांताबाईंच्या मदतीला धावून आली आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील नेरल्यात तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड (Dr. Rajendra Bharud) यांनी घरासाठी जागा मिळवून दिली होती. मात्र, भारुडांची बदली झाली आणि हा विषय मागे पडला.

Bacchu Kadu News
Union Budget 2023 : मोदींना भारत जोडोची टक्कर; सत्ताधाऱ्यांच्या घोषणांना संसदेत विरोधकांचे जोरदार प्रत्युत्तर

त्यामुळे एकेकाळी महाराष्ट्रभर नावाजलेल्या लोककलावंत शांताबाई काळे यांना भाड्याच्या घरात कसेबसे दिवस काढण्याची वेळ आली होती. आता इथून पुढे जोपर्यंत शांताबाईंच पक्क घर तयार होत नाही तोपर्यंत घराचे भाडे आणि उदरनिर्वाहाची जबाबदारी प्रहार जनशक्ती पक्षाने दाखवली आहे.

त्याचबरोबर लवकरात लवकर दोन पक्क्या खोल्या बांधून देण्याचीही जबाबदारी प्रहार जनशक्ती पक्ष घेणार आहे. त्यामुळे शांताबाईंच्या घराची प्रतीक्षा सध्या तरी संपल्याच दिसून येत आहे. शांताबाई या किशोर काळे यांच्या आई आहेत. किशोर काळे यांची 'कोल्हाट्याचे पोर' ही कादंबरी प्रचंड गाजली आहे. त्यांनी या कादंबरीच्या माध्यमातून लोककलावंतांची दैयनीय अवस्था अधोरेखीत केली होती.

Bacchu Kadu News
Sanjay Rathod : यांनी वाचलाच नाही अर्थसंकल्प, तर इंग्रजीतून मांडल्याने बच्चू कडू नाराज !

अनेकांच्या दुख:ला वाचा फोडणारे लेख किशोर काळे यांच्या आईवरच कोणी घर देता का घर म्हण्याची वेळी आली आहे. किशोर काळे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत आपला वेगळा ठसा निर्माण केला होता. मात्र, त्यांचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्वेवी मृत्यू झाला. त्यामुळे परिस्थितीशी झगडून आपले आयुष्य उभे करत असतांनाचा त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे शांताबाई काळे यांच्यावर पुन्हा भाड्याच्या घरात राहण्याची वेळी आहे. आता त्यांच्या मदतीसाठी बच्चू कडू पुढे झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com