मुंबई : आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि मी फकीर आहोत. देवेंद्रची (देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis) कृपा म्हणून आम्ही आमदार मंत्री झालो, असे वक्तव्य आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. (Due to Devendra Fadnavis, Padalkar and I became MLAs and ministers : Sadabhau Khot)
पंचायत राज समितीच्या माध्यमातून सांगोल्याचा दौऱ्यावर आलेले सदाभाऊ खोत यांना अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने अडवून ‘अगोदर माझे पैसे द्या; मगच पुढच्या दौऱ्यावर जावा’ असे म्हणून थकीत बिलासाठी हुज्जत घातली होती. त्यानंतर शिनगारे यांनी आपला राष्ट्रवादीशी संबंध नसल्याचे सांगून खोत यांच्याकडे थकबाकीवर ठाम असल्याचे सांगितले. त्याला सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले.
सदाभाऊ खोत म्हणाले की, सोलापूरच्या दौऱ्यावर असताना मला अडवून हॉटेलमालक अशोक शिनगारे यांनी बिल मागण्याचा प्रकार घडला. त्यामागे राष्ट्रवादी आहे, याचा भांडाफोड मी केला आहे. हाॅटेल मालक म्हणत होता माझा राष्ट्रवादीशी काही संबंध नाही. मात्र, एनसीपीच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी त्याचा फोटो आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागताच्या फलकावरही शिनगारे यांचा फोटो आहे.
सदाभाऊ खोत यांच्या निवडणुकीत त्यांच्या मुलाच्या सांगण्यावरून जेवणावळी घातल्या, असा आरोप शिनगारे यांनी केला. मात्र, प्रचार १५ एप्रिल रोजी संपला, ता. १७ एप्रिलला रोजी मतदान झाले. निवडणूक झाल्यानंतर २५ दिवस प्रचाराचा काळ संपला असताना ते कसं काय जेवण देत होते. शिवाय, ज्या कागदावर त्यांनी टिपणं केली आहेत, त्याला ९ वर्षांनंतर साधी घडीही पडली नव्हती. बरं ९ वर्षांनंतरच ते का बोलत आहे. आरोप करताना तारखा, वेळ पाहिले नाही. निवडणुकीनंतर १५ दिवसानंतर फोन केला आणि मी आमदार, मंत्री झाल्याचे ते सांगातात. पण मी २०१६ मध्ये आमदार आणि मंत्री झालाे. त्यामुळे माझी नाचक्की करण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे. त्यामागे राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे आहेत, असा आरोपही खोत यांनी केला.
सांगोल्यातील घटना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी रचलेले कटकारस्थान आहे. पण मीही कच्च्या गुरुचा चेला नाही. तुमच्यात दम असेल तर तुम्ही कुठल्या मैदानात यायचे तेवढं सांगा, त्यासाठी मी तयार आहे. मी मुंबईमध्ये होतो. मला त्याबाबत काही माहिती नाही, असे सांगून ते आता साजूकपणाचा आव आणत आहेत. पण, लोकं तिहार कारागृहात बसून काम करतात. तुम्ही मुंबईत म्हणजे काय पाकिस्तानमध्ये होता का? असा प्रश्नही खोत यांनी या वेळी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.