खडसे-शहांच्या भेटीच्या चर्चेत नवा ट्विस्ट; आता पवारांच्या उपस्थितीत खडसे शहांना भेटणार!

खडसे हे शहा यांना कशासाठी भेटणार आहेत आणि पवारांच्या उपस्थितीत ती भेटणार कधी होणार, याची उत्सुकता असणार आहे.
Sharad Pawar-Amit Shah-Eknath Khadse
Sharad Pawar-Amit Shah-Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना भेटणार आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी दिली. यामुळे खडसे-शहा यांच्या भेटीच्या बातम्यांमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. खडसे यांनीही अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती पवारांनी दिली असल्याचे स्पष्ट केले. (Eknath Khadse will meet Amit Shah in the presence of Sharad Pawar)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे हे दिल्लीला गेले होते. मात्र, शहा यांच्याशी त्यांची भेट होऊ शकलेली नाही. या दोघांमध्ये फोनवरून बोलणे झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेवरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिलेल्या माहितीवरून यात नवा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे खडसे हे शहा यांना कशासाठी भेटणार आहेत आणि पवारांच्या उपस्थितीत ती भेटणार कधी होणार, याची उत्सुकता असणार आहे.

Sharad Pawar-Amit Shah-Eknath Khadse
खासदार नवनीत राणांविरोधात दुसऱ्यांदा अजामीनपात्र अटक वॉरंट

तपासे म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षात जाण्याच्या संदर्भात जी बातमी माध्यमांमध्ये दाखवली जात आहे. ती साफ चुकीची आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी खडसे यांची भेट झालेली नाही. त्या दोघांमध्ये फक्त फोनवरून चर्चा झाली आहे. ती चर्चा होण्याच्या अगोदर नाथाभाऊंनी संबंधित विषय शरद पवारांना सांगितला होता. पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे हे अमित शहा यांची भेट घेणार आहेत. नाथाभाऊ एकटे जाणार नव्हते, पवारांसोबतच ते जाणार होते. मात्र, ती भेट अजून झालेली नाही. त्यामुळे खडसे हे भाजपमध्ये जाणार हे वृत्त चुकीचे आहे.

Sharad Pawar-Amit Shah-Eknath Khadse
अटकेच्या भीतीने राष्ट्रवादीचे नेते सपाटे झाले गायब; शिक्षिकेकडून अत्याचाराची फिर्याद

यासंदर्भात एकनाथ खडसे म्हणाले की, माझी आणि अमित शहा यांची भेट झालेली नाही. मी त्यांना फोन केला होता. फक्त फोनवर चर्चा झाली. ही चर्चा काही व्यक्तीगत कारणांसाठी होती. या भेटीच्या संदर्भात मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पूर्वकल्पना दिलेली होती. भाजपसाठी मी फार मेहनतीने, कष्टाने काम केले आहे. पण नंतरच्या कालखंडात भाजपमध्ये मला जी अपमानास्पद वागणूक मिळाली. छळवणूक झाली, खोट्या केसेस करण्यात आल्या. त्यामुळे मी भाजप सोडला आहे आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीने मला सन्मानाने विधान परिषदेची आमदारकी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com