Belgaum News : बेळगावात फडणवीस, चव्हाण, सतेज पाटलांना काळे झेंडे दाखवून निषेध : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना धक्काबुक्की

महाराष्ट्रातील नेत्यांनी समितीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येऊ नये, अशी मागणी केली होती.
Belgaum News
Belgaum NewsSarkarnama

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराविरोधात प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात (Belgaum) येऊ नये, अशी मागणी मराठी भाषिकांनी केलेली असतानाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बेळगावात दाखल झाल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. या वेळी निषेध नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली असून आणि कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या दडपशाहीचा मराठी भाषिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (Fadnavis, Chavan, Satej Patil protest by showing black flags in Belgaum)

दरम्यान, बेळगाव ग्रामीण मतदार संघात प्रचारासाठी आलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनाही मराठी भाषिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. बेनकनहळ्ळी ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदविला.

महाराष्ट्र एकीकरण समितीने सर्व मतदारसंघात एकच उमेदवार दिल्यामुळे मराठी भाषिक कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच समितीच्या उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी समितीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येऊ नये, अशी मागणी केली होती. तरीही फडणवीस हे बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी टिळक चौकात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला.

Belgaum News
Ajit Pawar News : अजित पवार भाजपच्या सीमारेषेवर : केंद्रीय मंत्र्याचा गौप्यस्फोट

फडणवीस सभास्थळी येण्यास निघाल्याची माहिती मिळताच टिळक चौक आणि परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे दाखवले. मात्र मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना सभेपर्यंत जाऊ दिले नाही, तसेच अनेक कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करून माघारी पाठविले. अनेक कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. समितीच्या नेत्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतल्याने सकाळपासूनच कोनवाळ गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. तरीही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून समिती उमेदवारांच्या विरोधात प्रचारासाठी आलेल्या फडणवीस यांचा निषेध नोंदविला.

यावेळी मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, महेश जुवेकर, दत्ता उघाडे, चंद्रकांत कोंडुसकर, शुभम शेळके, नेताजी जाधव, रणजित चव्हाण-पाटील, सुनिल बाळेकुंद्री, शुभम शेळके, प्रवीण जाधव, सूरज कणबरकर, मारूती मरगानाचे, महादेव मंगनाकर, पांडुरंग पट्टण, किसन रेडेकर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Belgaum News
Karnataka Assembly Electon : येडियुरप्पा जुने हिशेब चुकते करणार...भाजपचा फायर ब्रॅंड नेता अडचणीत?

काँग्रेस नेत्यांवरही मराठी भाषिकांचा राग

दुसरीकडे, बेळगावच्या ग्रामीण भागातील बेनकनहळ्ळी येथे काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सतेज पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने चौकात जमा झाले होते. काही वेळानंतर चव्हाण व पाटील गावात दाखल होतात कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, समिती विरोधात प्रचार करणाऱ्यांचा धिक्कार असो आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. तसेच कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकून त्यांना परत जाण्याची विनंती केली.

Belgaum News
Sharad Pawar News : तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता होती; पण...: शरद पवार राजीनाम्यावर दोन दिवसांनंतर बोलले

कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू केल्याने वातावरण तंग होत असल्याचे पाहून पोलिसानी ग्रामस्थांना रोखून धरले. तरीही महिला व कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना माघारी धाडत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

कार्यकर्त्यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करून परिसर दणाणून सोडला होता. तसेच ज्या ज्या गावात समिती उमेदवारांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील नेते येथील त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला जाईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com