Satyajeet Tambe News : सत्यजित तांबेंच्या उमेदवारीबाबत राम शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट : ‘फडणवीसांनी तांबेंना अगोदरच सांगितले होते’

सत्यजित तांबे यांची उमेदवारी ही ओपन सिक्रेट आहे.
Devendra Fadnavis-Satyajeet Tambe-Ram Shinde
Devendra Fadnavis-Satyajeet Tambe-Ram ShindeSarkarnama

पुणे : ‘‘नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातच सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना ओपन सांगितले होते, त्यामुळे सत्यजित तांबे यांची उमेदवारी ही ओपन सिक्रेट आहे,’’ असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी मंत्री प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला. (Fadnavis had already told Satyajit Tambe about Nashik candidature : Ram Shinde)

नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होऊन आणि एबी फॉर्म मिळूनही डॉ. सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Devendra Fadnavis-Satyajeet Tambe-Ram Shinde
AjitDada on Shinde-Fadnavis : शिंदे-फडणवीसांना ‘त्या’ गोष्टीची भीती, त्यामुळेच ते निवडणुका पुढे ढकलत आहेत : अजितदादांनी उघड केला डाव

सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीमागे भाजप असल्याची चर्चा राज्यात सुरू झाली होती. त्याला तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या विधानाचा संदर्भ दिला जात होता. त्यामुळे तांबे यांच्या उमेदवारीमागे खुद्द फडणवीसच असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता खुद्द भाजप नेत्यांनीच तांबे यांच्या उमेदवारीबाबत गौप्यस्फोट केला आहे.

Devendra Fadnavis-Satyajeet Tambe-Ram Shinde
Ajit Pawar News : कुणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या; त्यांना चांगले सटकावा : अजितदादांची पोलिसांना सूचना

राम शिंदे म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघ ही काँग्रेसची विनिंग सीट होती, तरी त्यांनी तांबे यांना वेळेत एबी फॉर्म का दिला नाही? शिवाय, सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमातच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकबाबत ओपन सांगितलं होतं, त्यामुळे सत्यजित यांची उमेदवारी ही ओपन सिक्रेट आहे.

Devendra Fadnavis-Satyajeet Tambe-Ram Shinde
Satyajeet Tambe News : ...तर सत्यजित तांबे यांचा प्रचार करू : राधाकृष्ण विखे पाटलांनी दाखवली तयारी

पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवार यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ऐकले नव्हते, त्यामुळे आता थोरात त्यांचं का ऐकतील, असा सवालही राम शिंदे यांनी केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांना आधीच सांगितले होते, त्यामुळे आम्ही असा कोणताही गेम खेळलेलो नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com