नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विधानसभेची २०१९ ची निवडणूक लढू नये. पार्टीचे काम करत आणि ३२ मतदारसंघ त्यांनी सांभाळावेत, असा निर्णय पक्षात झाला होता. त्या वेळी अनेकांना वाटायचं की चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकारण संपलं. अनेकांनी तसं बोलूनही दाखवलं होतं. मी त्याचवेळी सांगितले होतं की, बावनकुळे यांच्यासारख्या कार्यकत्याचं महत्व भाजपला माहिती आहे. तुम्ही विचार करताय, त्यापेक्षा मोठे बावनकुळे तुम्हाला बघायला मिळतील, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेचेच्या २०१९ च्या निवडणुकीत बावनकुळे यांचे तिकिट कापण्यामागील कारण सांगितले. (Fadnavis said, the reason behind cutting the assembly ticket of Bawankules...)
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी मागील २०१९ च्या निवडणुकीतील तिकिट वाटपातील गोष्टीचा उल्लेख केला. त्यावेळी त्या गोष्टीची मोठी चर्चाही झाली होती.
फडणवीस म्हणाले की, विधानसभेची २०१९ ची निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे यांनी लढू नये. त्याऐवजी पार्टीचे काम करावे. राज्यातील ३२ मतदारसंघ त्यांनी सांभाळावेत, असा निर्णय झाला होता. त्या वेळी अनेकांना वाटायचं की चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकारण संपलं. अनेकांनी ते बोलूनही दाखवले होते. पण आपल्या पक्षात कधीतरी आमदार, खासदारांनी पक्षाचे काम केले पाहिजे, तर कार्यकर्त्यांना संसदीय निवडणुका लढविण्याचे काम दिले जाते. ज्या दिवशी हा निर्णय झाला. त्या दिवसांपासून एकही दिवस बावनकुळे थांबले नाहीत. त्यांनी तत्काळ तो निर्णय स्वीकारत ताकदीने कामाला सुरुवात केली. त्या निवडणुकीत ३२ मतदारसंघात दौरे करून तेथील भाजपचे उमेदवार निवडून कसे येतील, याचा विचार केला. आपल्या पक्षात सातत्य, पक्षशिस्त जे पाळतात, त्यांना कधीच मागे पहावे लागत नाही, याचे चंद्रशेखर बावनकुळे हे उदाहरण आहेत.
नागपूर आणि विदर्भासाठी आज अभिमानाचा दिवस आहे. आपल्यातील एक असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आपल्या शीर्षस्थ नेत्याने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्षपद मिळणं, ही फार मोठी जबाबदारी आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा सन्मान मला मिळाला, त्या अगोदर नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, भाऊसाहेब फुंडकर यांना ती संधी मिळाली. उत्तमराव पाटील, वहाडणे पाटील, ना. स. फरांदे, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, भाऊसाहेब फुंडकर या अध्यक्षांनी हा पक्ष राज्यातील सर्व स्तरावर पोचवला. आधुनिक काळात मुनगंटीवार, मला, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. पाटील यांनी संक्रमणाच्या काळात अध्यक्ष म्हणून उत्तम काम केले, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
फडणवीस म्हणाले की, ऊर्जामंत्री असताना तीनही वीज कंपन्यांना नफ्यात आणण्याचे काम बावनकुळे यांनी केले. तसेच त्यांच्याकडे तीन जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते. त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. महावितरणची विज अगोदर स्वस्तात कशी तयार करता येईल, हे त्यांनी पाहिले. ते त्यांनी करून दाखवले, त्यानंतर त्यांनी बाहेरील कंपन्यांकडून कमी कमीत वीज खरेदी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.