
What Are Fighter Jet Generations? : फायटर जेट म्हणजेच लढाऊ विमानं कोणत्याही देशाच्या वायूदलाच्या ताकदीचा महत्त्वपूर्ण भाग असतात. ही विमानं केवळ शत्रूंच्या हवाई हल्ल्यांना रोखण्याचंच काम करत नाहीत, तर युद्धाच्या मैदानात आक्रमक कारवाई करण्यासही सक्षम असतात. या विमानांची क्षमता केवल गती आणि शस्त्रांना लाँच करण्यापुरतीच मर्यादित नाही, तर हे अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्टील्थ लपण्याची क्षमता, रडारास चुकवने आणि एआय इंटिग्रेशनपर्यंत पोहचले आहेत. मागाली काही दिवसांत भारताने दहशतवाद आणि पाकिस्तानविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमच्या यशातही फायटर जेट्सचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
अशातच सोशल मीडियावर कावेरी इंजिनबात ट्रेंड दिसून आला. हे एक आधुनिक गॅस टर्बाइन इंजिन आहे. ज्यास फायटर जेट्समध्ये वापरता येवू शकतं. या इंजिनद्वारे भारत 5th जनरेशनचे फायटर जेट निर्माण करण्याच्या तयारीत आहे. सध्या जगातील सैन्य शक्ती असणाऱ्या देशांच्या वायू दलाच्या ताफ्यात 4th, 4.5th आणि 5th जनरेशनचे फायटर जेट्स आहेत. तर 6th जनरेशनच्या फायटर जेट्सबाबतही काही देश तयारी करत आहेत.
फायटर जेट्स त्यांच्या भूमिकांच्या आधारावर वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागली जातात. उदाहरणार्थ हवाई क्षेत्रातील नियंत्रणासाठी एअर सुपीरियोटी फायटर जेट्सचा वापर केला जावू शकतो. तेच हवा आणि जमीन दोन्ही ठिकाणी हल्ला करण्याची क्षमता असणारे लढाऊ विमानं मल्टीरोल फायटर जेट्स म्हणून ओळखली जातात. याशिवाय शत्रूंची विमानं रोखणाऱ्या फायटर जेट्सना इंटरसेप्टर म्हटले जाते. तर जमिनीवर हल्ला करणाऱ्यांना ग्राउंट अटॅक फायटर जेट्स म्हणतात.
हे फायटर जेट्स सर्वसाधारणपणे कमी वजानाचे असतात आणि यामध्ये एअर टू एअर मिसाइल आणि रडारासोबतच पारंपारिक एअर टू एअर युद्ध लढण्याचीही क्षमता असते. वेगाने उडण्यासोबतच हलक्या वजनाची क्षेपणास्त्र सोडण्यासही हे सक्षम असतात.
हे फायटर जेट्स चौथ्या जनरेशनच्या तुलनेत अधिक आधुनिक असतात. यामध्ये उत्कृष्ट इंजिनासह अद्यावत असे सेन्सर बसवलेले असतात. या जनरेशनचे जेट्स लपण्यास सक्षम असतात, त्यांना रडारापासून वाचण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.
हे सद्यस्थितीतील सर्वात अत्याधुनिक असे जेट्स म्हणून ओळखले जातात. यामध्ये रडारकडून पकडले न जाण्याची क्षमता आहे. तसेच सुपरसोनिक क्रूझिंग आणि सुपरसोनिक टर्न सारख्या क्षमताही आहेत. हे एआय इंटिग्रेशन, डेटा लिंकिंग आणि मल्टीसेन्सरने परिपूर्ण असतात.
भारतीय वायुदलात असलेले राफेल 4.5th जनरेशनचे फायटर जेट आहे. यास भारताने फ्रान्सकडून खरेदी केले आहे. फ्रान्सची कंपनी डसॉल्ट एव्हिएशने यास डिझाइन केले आणि निर्मिती केली आहे. हे फायटर जेट स्टील्थ म्हणजेच लपण्याची क्षमता, सेन्सर आणि क्षेपणास्त्र प्रणालीच्या योग्य संयोजनाने परिपूर्ण आहे. राफेलचा कमाल वेग १,९१२ किमी प्रतितास आहे. तर याचा पल्ला ३७०० किलोमीटर पर्यंत आहे. हे हवेतून हवेत मारा करण्यासोबतच एअर रिफ्यूलिंग तंत्रज्ञानानेही परिपूर्ण आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.