Manohar Joshi : व्हीआयपींचे नाही, तर शिवसैनिकांचे, कार्यकर्त्यांचे 'मुख्यमंत्री'

Shiv Sena Leader : मनोहर जोशींसाठी बाळासाहेब दैवत आणि शिवसैनिक होते प्राण; गरिबांसाठी सुरू केले झुणका भाकर केंद्र
Gulabrao Gawande, Manohar Joshi
Gulabrao Gawande, Manohar Joshi Sarkarnama

Shiv Sena Akola : मुख्यमंत्री म्हणून व्हीआयपी असल्याचा भास कधीच मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात नसायचा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात बिगर काँग्रेसी पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांच्यावर विश्वास टाकला. तो त्यांनी सार्थ ठरविला. शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांच्याकडे नेत्यांपेक्षा कार्यकर्ते अधिक जवळ राहत असत. अगदी कुठल्याही जिल्ह्यात दौरा असेल तर तेथील शासकीय व्हीआयपी सर्किट हाऊस हे कार्यकर्त्यांनी फुल राहत असे आणि त्या कार्यकर्त्यांच्या, शिवसैनिकांच्या गराड्यात मुख्यमंत्री मनोहर जोशी कायम दिसत असत. युतीच्या पहिल्या दीड वर्षाच्या काळात मराठवाड्यातील अपक्षांचे नेते अशोक पाटील डोणगावकर हे मोठे प्रस्थ त्यावेळी होते. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यावर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना 'व्हीआयपींचा मुख्यमंत्री नाही तर कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री' अशी घोषणाच करून टाकली. भविष्यात शिवसेनेसोबत अशोक पाटील डोणगावकर यांचे जास्त सख्य राहिले नाही. (Former Maharashtra CM Manohar Joshi Died)

अनेक शिवसैनिकांना मोठे करण्यात मोलाचा वाटा मनोहर जोशी यांचा होता. त्यांनी तळागाळातील शिवसैनिकांसाठी संधी निर्माण केली ती योग्य व्यक्तीला दिलीदेखील. काँग्रेस सरकारच्या काळात शिवसैनिकांना सत्तेविषयी असलेले कुतूहल, नावीन्य जपण्यात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कुठेही काटकसर ठेवली नाही. शिवसेनेची आलेली सत्ता ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कष्टामुळे आणि शिवसैनिकांमुळे आल्याचा त्याचा दृढ विश्वास होता. त्यामुळे मनोहर जोशींसाठी एकीकडे बाळासाहेब ठाकरे हे दैवत आणि दुसरीकडे शिवसैनिक हा त्यांचा प्राण होते. त्यामुळे या दोघांमध्ये समन्वयाची भूमिका मनोहर जोशी यांची होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. शिवसेनेचा मुख्यमंत्री काँग्रेसी नेत्यांप्रमाणे व्हीआयपी आहे हा भास त्यांनी कधी निर्माण होऊ दिला नाही. त्यामुळे ते व्हीआयपींचे मुख्यमंत्री न राहता सामान्य शिवसैनिकांचे, कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gulabrao Gawande, Manohar Joshi
Manohar Joshi News : ...अन् जोशी सरांनी शेकडो कार्यकर्त्यांना दिलं हक्काचं छप्पर!

अकोल्यातील कट्टर शिवसैनिक आणि आता राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव गावंडे यांच्या गळ्यात कायम शिवपट्टा असतो. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तरी त्यांच्या गळ्यातील शिवपट्टा मात्र काही निघाला नाही. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांची वेशभूषा त्यांची लांब दाढी आणि गळ्यात शिवपट्टा हे कायम आहे. मुख्यमंत्री झाल्यावर अकोल्यात आले असता मनोहर जोशी यांनी गुलाबराव गावंडे यांना त्यांच्या दाढीवरून आणि गळ्यातील शिवपट्ट्यावरून तुम्ही छत्रपती संभाजीराजांसारखे दिसता असे जाहीर सभेत सांगितले. त्यांच्या हस्ते अकोल्यातील दगडी पुलाचे भूमिपूजन, त्याचबरोबर उमरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा झाला होता. त्यावेळचा हा किस्सा आज ही कट्टर शिवसैनिक सांगतात. अकोल्यातील याच विविध कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या बाजूचा कार्यकर्त्यांचा गराडा पाहूनच अशोक पाटील डोणगावकर यांनी मनोहर जोशी हे व्हीआयपींचे मुख्यमंत्री नाही, तर कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री आहेत, असा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. गुलाबराव गावंडे यांनी त्यांच्या चाल, दाढी, शिवपट्टा यामुळे मनोहर जोशी सर मला छत्रपती संभाजीराजे यांच्यासारखे दिसत असल्याचे पाणी परिषदेत जाहीर सभेत सांगितल्याची आठवण सांगतात. मनोहर जोशी सर हे वेळेचे पक्के होते. त्यांनी दिलेला वेळ त्यांनी नेहमी पाळल्याची आठवण गुलाबराव गावंडे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितली.

गरीब मराठी माणसांसाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी एक रुपयात झुणका भाकर ही स्किम आणली. ती अनेक वर्षे सुरू होती. यातून कुणीही उपाशी झोपू नये हाच उदात्त हेतू होता. हे झुणका भाकर केंद्र चालविण्याचे कंत्राट अनेक शिवसैनिकांना मिळाले. ते बस स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे स्टेशन परिसरात आजही अनेक जिल्ह्यांत मोठ्या दिमाखात उभे आहे. आजही अनेक जिल्हा रुग्णालयात, महिला रुग्णालयात या झुणका भाकर केंद्रातून हजारो गरिबांचे पोट भरले जाते. अनेक कष्टकरी कमी खर्चात याच झुणका भाकर केंद्रावर जेवण घेतात. मनोहर जोशी यांच्या काळातील ही झुणका भाकर केंद्र आजही अनेकांच्या जेवणाची सोय करणारी अशीच आहे. गरिबांविषयीची तळमळ आणि महाराष्ट्रातील परिस्थितीची जाण असल्यानेच मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी यांनी घेतलेला निर्णय लोकहिताचा हाेता. (Former Maharashtra CM Manohar Joshi Died)

R

Gulabrao Gawande, Manohar Joshi
Rajendra Patni : कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी घेतला अखेरचा श्वास

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com