Fracturd Freedom : काय आहे ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम'चा वाद? कोण आहेत कोबाड गांधी?

Fracturd Freedom : झा यांच्या 'चक्रव्यूह'या सिनेमात दिवंगत अभिनेते ओम पुरी यांनी कोबाड गांधींची भूमिका साकारली होती.
Fracturd Freedom Kobad Gandhi
Fracturd Freedom Kobad GandhiSarkarnama
Published on
Updated on

Fracturd Freedom : कोबाड गांधी लिखित आणि लेखिका अनघा लेले यांनी मराठीत अनुवादीत केलेल्या 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' या पुस्तकाला राज्यशासनाकडून जाहीर झालेला पुरस्कार, जीआर काढून अचानकपणे रद्द केला आहे. पुरस्कार परत मागे घेतल्याने, आता अनेक लेखकांकडून याचा निषेध केला जातोय. लेखिका व कवयत्री प्रज्ञा पवार, नीरजा यांनी याचा निषेध व्यक्त करत, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.

डॉ. प्रज्ञा दया पवार, नीरजा आणि लक्ष्मीकांत देशमुख यांनी महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचा राजीनामा दिला आहे. कोबाड गांधींच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी अनघा लेले यांना 6 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार 2021 जाहीर करणाऱ्या समितीचे ते सदस्य होते. मात्र, सरकारने पुरस्कार मागे घेण्याची घोषणाच केली नाही, तर पुरस्कार निवड समितीही बरखास्त केली.

कोबाड यांना त्यांच्या कथित माओवादी संबंधांमुळे पुरस्कार प्रदान करण्याच्या निर्णयावर, काही गटांकडून सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर सरकारचा निर्णय आला. डॉ. प्रज्ञा पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'महाराष्ट्र सरकारचा निवड समिती बरखास्त करण्याचा निर्णय एकतर्फी असून, हा लोकशाही प्रक्रियेचा अपमान आहे. मी महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Fracturd Freedom Kobad Gandhi
PM Narendra Modi: गुजरात निवडणुकीतील विजय कोणामुळे? पंतप्रधानांनी स्पष्टचं सांगितलं...

लेखिका नीरजा यांनीही राजीनाम्यामागे हेच कारण सांगितले. 'जर मंडळ आमच्या पाठीशी उभे नसेल आणि आम्हाला पाठिंबा देत नसेल तर आम्ही सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत. माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे आणि सरकारच्या निर्णयामुळे मला खूप दु:ख झाले आहे.' सोमवारी सरकारने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, निवड समितीचा निर्णय "प्रशासकीय कारणास्तव" बदलण्यात आला आणि पुरस्कार (ज्यामध्ये एक लाख रुपये रोख रक्कम होती) मागे घेण्यात आला आहे.

काय आहे पुस्तकात?

'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' हे पुस्तक म्हणजे कोबाड गांधी यांच्या आजवरच्या कठीण प्रवासाचे आत्मकथन आहे. त्यांची पत्नी अनुराधा आणि कोबाड गांधी यांच्या आयुष्यातील आजवरच्या वाटचालीची ही कहाणी आहे. वंचित, उपेक्षितांसाठी काम करणे. अधिक मानवी मूल्य रूजवणे, सामाजिक न्याय समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचायला हवी, हे त्यांच्या आयुष्याचा उद्दिष्ट असल्याचे पुस्तकातून समजते. गांधी यांच्या पूर्व आयुष्यातील, भूतकाळातील आठवणी, तुरुंगातील, कोठडीतील अनुभव त्यांनी पुस्तकरूपात मांडले आहेत.

Fracturd Freedom Kobad Gandhi
Pradnya Pawar : 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम'चा पुरस्कार परत घेतल्याने, प्रज्ञा पवार यांचा तडकाफडकी राजीनामा!

कोण आहेत कोबाड गांधी?

कोबाड यांची प्रतिमा 'डून स्कूलमधून शिक्षण घेतलेला, लंडनमध्ये राहून आलेला नक्षलवादी नेता' अशी होती. त्यावेळी नक्षलवाद हा मोठा चर्चेतला विषय होता. या चळवळीतल्या माणसाची प्रतिमा रॉबिन हूड या व्यक्तिमत्त्वा सारखी समजली जात होती. यामुळे हा विषय चित्रपटसृष्टीतही आला.

कोबाड यांच्या जीवनावरुनच पहिला चित्रपट प्रकाश झा यांनी निर्मित केला. झा यांच्या 'चक्रव्यूह'या सिनेमात दिवंगत अभिनेते ओम पुरी यांनी कोबाड गांधींची भूमिका साकारली होती. दुसरा चित्रपट मणिरत्नम यांचा 'रावण' त्यामध्ये अभिषेक बच्चनने कोबाड यांची भूमिका केल्याची जाहिरात होती आणि तिसरा चित्रपट होता फारसा गाजावाजा न झालेला 'रेड अलर्ट' त्या चित्रपटात विनोद खन्ना यांनी नक्षलवादी कार्यकर्त्याची भूमिका केली होती.

कोबाड यांना आतापर्यंत भारतभरातील विविध तुरुंगांमध्ये दहा वर्षांपेक्षा जास्त शिक्षा भोगावी लागली. या मोठ्या कालावधीतील तुरुंगातल्या दिवसांबद्दल, भारतीय कायदा, पोलिस व्यवस्थेच्या आलेल्या अनुभवाबद्दल लेखन केले आहे. कोबाड यांना 2009 साली अटक झाली होती. माओवाद्यांचा प्रमुख नेता म्हणून त्यांना दहा वर्षांची शिक्षा झाली होती.

शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळी त्यांचे वय 62 वर्षे होते. तुरूंगात रवानगी झाली तेव्हाही त्यांना वेगवेगळ्या शारीरीक विकारांनी ग्रासले होते. त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप सिद्ध करता आले नाही. शेवटी, त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. मात्र या न्यायालयीन प्रक्रियेत त्यांच्या आयुष्याची दहा वर्षे तुरुंगात गेली होती. 'फॅक्चर्ड फ्रीडम' हे पुस्तक मूळ इंग्रजीतून लिहलेले आहे. याचा अनुवाद अनघा लेले यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com