गोपीनाथ मुंडेंच्या सांगण्यावरून मी धनंजय मुंडेंनाही मतं दिलंय : ठाकूरांनी सांगितले गुपीत

आजपर्यंत कोणीही माझ्यावर आरोप करू शकलं नाही. पण, दुर्दैवाने या वेळी आमच्यावर आरोप झाले.
Gopinath Munde, Dhananjay Munde, Hitendra Thakur
Gopinath Munde, Dhananjay Munde, Hitendra ThakurSarkarnama

मुंबई : आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या सर्वांना मत दिलं आहे. (स्व.) गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या सांगण्यावरून मी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनाही मतं दिले आहे. आजपर्यंत कोणीही माझ्यावर आरोप करू शकलं नाही. पण, दुर्दैवाने या वेळी आमच्यावर आरोप झाले, अशी खंत आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी व्यक्त केली. (I also voted for Dhananjay Munde on the advice of Gopinath Munde: Hitendra Thakur)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना आमदार ठाकूर यांनी राज्यसभा निवडणुकीनंतर झालेल्या आरोपाबाबत खंत व्यक्त केली. राज्यसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आम्हाला काही अपक्ष आणि हितेंद्र ठाकूर यांची मते मिळाली नाहीत, असा आरोप केला होता. त्यावर ठाकूर यांनी विधानसभेत बोलताना भाष्य केले.

Gopinath Munde, Dhananjay Munde, Hitendra Thakur
अजितदादांनी पैसे दिले नाहीत, असे आम्ही आयुष्यात कधीही म्हणणार नाही!

हितेंद्र ठाकूर म्हणाले की, राज्यसभा, विधान परिषद निवडणूक आणि राज्यातील सत्तांतर यानंतर महाराष्ट्रात जी चर्चा झाली आहे. ती काही फार चांगली आहे, असे कोणीही म्हणणार नाही. या प्रकारासाठी कुणाकडे तरी बोटे दाखवण्यात आली आहेत. काही आक्षेपही घेण्यात आली, त्यात काहींची नावेही घेण्यात आली. त्यामध्ये आमच्या पक्षाच्या आमदारांची नावेही घेण्यात आली होती. आम्ही कुणाच्या गोठ्यात दावणीला बांधलेले आमदार नाही आहोत. आमचा वेगळा पक्ष आहे, तो आम्ही आमच्या पद्धतीने चालवतो. आमच्या पद्धतीनेच आम्ही शब्द देतो. पण, काही लोकांनी आमची बदनामी केली. चांगल्या भाषेत बोलता येऊ शकणाऱ्या गोष्टी घोडेबाजारापासून इतर गोष्टी बोलल्या गेल्या, त्या दुर्दैवी आहेत. आजपर्यंत कोणीही आरोप करू शकलं नाही. पण दुर्दैवाने या वेळी आमच्यावर आरोप झाले.

Gopinath Munde, Dhananjay Munde, Hitendra Thakur
अशोक चव्हाणांच्या मनात चाललंय तरी काय? विश्वासदर्शक ठरावास समर्थकांसह गैरहजर!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी पूर्वीपासून ओळखतो. पूर्वी एक जिल्हा असल्यामुळे त्यांच्याशी आमचा संबंध आहे. पूर्वीच्या शिवसेना नेत्यांनी मिळेल त्या साधनांच्या साहाय्याने संघटना बांधली. गावपातळीपर्यंत त्यांनी शिवसेना पोचवली. शिवसेना वाढविण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बऱ्याच जणांना झटके दिले आहेत. मागील विधानसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी आमचाही आमदार त्यांनी शिवसेनेत घेतला. काय कला आहे, माहिती नाही. पण, त्याबद्दल दुःख नाही. कारण प्रत्येक पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतो. मुख्यमंत्री महोदय तुम्ही एकत्र आहे, असे सांगता. पण, तुमच्या शेजारी जे (देवेंद्र फडणवीस) बसले आहेत, तेही गोड बोलतात आणि तेच काम (फोडाफोडीचे) करतात, त्यामुळे प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com