राष्ट्रवादी सोडली नसल्याचे सांगत महेश कोठेंनी विधानसभा ‘या’ मतदारसंघातून लढण्याची केली घोषणा

सगळेजण पवारांचा शब्द मानत असतील, मला मान्य करत असतील तर मी राष्ट्रवादीत काम करायला तयार आहे.
Mahesh Kote
Mahesh KoteSarkarnama

सोलापूर : मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सोडला, असं मी कधीही म्हटलेलं नाही. पण, आमदार (MLA) व्हायचंच, असं आमचं ठरलं आहे. विधानसभेची आगामी निवडणूक मी सोलापूर (Solapur) शहर उत्तरमधून लढणार आहे, त्यामुळे जो पक्ष आम्हाला आमदारकीचे तिकिट देईल. त्या पक्षात राहण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, असे स्पष्टीकरण सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kote) यांनी शिंदे गटातील प्रवेशाबाबत दिले. (I have not leave NCP : Mahesh Kote)

गेल्या दोन दिवसांपासून महेश कोठे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत म्हणजेच एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना कोठे यांनी वरील स्पष्टीकरण दिले. कोठे यांच्या वृत्तामुळे सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

Mahesh Kote
रश्मी बागल मुख्यमंत्र्यांचा सल्ला मानणार का?...विरोधक नारायण पाटलांशी जुळवून घेणार काय?

कोठे म्हणाले की, माझी मागणी आमदारकीची आहे. पण, महेश कोठे आमदार कसे होणार नाहीत, हे सगळ्याच लोकांनी आतापर्यंत प्रयत्न केले आहेत. पण आमदारकी घ्यायचीच, असं आम्ही ठरवलं आहे आणि आमदार काय काम करू शकतो, हे सोलापूरला दाखवायचं, असं आमचं ठरलं आहे. त्यामुळे आम्ही आमच्या ध्येयापासून जराही विचलित होणार नाही.

Mahesh Kote
सत्तारांचा राजीनामा मागणाऱ्या अजितदादांनाच मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा : ‘विरोधी पक्षनेत्यांच्या प्रकरणांचीही...’

ज्यांना मी राष्ट्रवादीत नको आहे, त्यांनी माझी तक्रार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे करायला पाहिजे. पवार यांना वाटलं की माझ्यापेक्षा ते सक्षम आहेत, तर पवारसाहेब त्यांच्याकडे नेतृत्व देतील. त्यामुळे हा विषय आपल्या अखत्यारितील नसल्यामुळे त्यांनी आपली कुवत बघून वागावं, असा टोलाही महेश कोठे यांनी पक्षांतर्गत विरोधकांना लगावला. कोणाला नेतृत्व द्यायचे आणि कोणाला द्यायचे नाही, हे पवार यांना माहिती आहे, त्यामुळे त्यांनी पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सांगितले तरी ते मी करायला तयार आहे, असेही कोठे यांनी स्पष्ट केले.

Mahesh Kote
सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी निलंबित : आरोग्य मंत्री सावंतांची विधान परिषदेत घोषणा

ते म्हणाले की, सोलापुरातील एका कार्यक्रमात मी सोलापूरच्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांच्याशी बोललो होतो. महेश कोठे हे शिंदे गटात प्रवेश करत असतील तर निधी दिला जाईल, असे मला सूचित केले होते. मात्र, मी राष्ट्रवादी सोडली, असे कधीही म्हटलेले नाही. काही लोक माझ्याविरोधात कायम बोलत असतात. मात्र त्यांच्याबद्दल मी जास्त बोलू इच्छित नाही.

Mahesh Kote
शिवसेनेत नाराजीनाट्य : सभेत बोलू न दिल्याने प्रवक्ते कार्यक्रम सोडून निघून गेले!

मला एवढंच सांगायचं आहे की, शरद पवार यांनी मला सन्मानाने अधिकार दिले होते. त्याच सन्मानाने मला वागणूक मिळत असेल आणि सगळेजण पवारांचा शब्द मानत असतील, मला मान्य करत असतील तर मी राष्ट्रवादीत काम करायला तयार आहे. मला मुख्यमंत्री शिंदे यांनीही भेटायला बोलावलं होतं. पण, मी एवढंचं सांगितलं की, मी यापुढची निवडणूक शहर उत्तरमधून लढवणार आहे. त्यामुळे जी पार्टी मला शहर उत्तरमधून तिकिट देईल, त्या पार्टीत राहण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही महेश कोठे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com